एक्स्प्लोर

Ganpati Special Trains : बुकिंग सुरु होताच आठ मिनिटांतच कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांची सगळी तिकीटं संपली, काळाबाजाराची चर्चा

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेचे तिकीट आरक्षण यंदाही सुरु होताच काही मिनिटात फुल झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2024) मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाडया चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला. कालपासून (दि. 21) विशेष गाड्यांच्या (Ganpati Special Trains) आरक्षणास (Reservation) सुरुवात झाली. मात्र आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल झाले. यामुळे तिकीट आरक्षणात पुन्हा एकदा काळाबाजार (Black Market) सुरु आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

गणेशोत्सव म्हणजे कोकणातील (Kokan) सर्वात मोठा आणि आवडता सण. गणेशोत्सवाला मुंबईतून (Mumbai) मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. साधारण गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीपासून कोकणातील मूळगावी जाण्याचे कोकणवासीयांचे नियोजन असते.  यंदा गणेशोत्सवास 07 सप्टेंबर रोजी सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाड्या (Kokan Special Trains) सोडण्यात येणार आहे. कालपासून तिकीट आरक्षणास सुरुवातही झाली. मात्र, काही वेळातच आरक्षण फुल झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे. 

तिकीट आरक्षण काही मिनिटातच फुल

गणेशोत्सवासाठी रेल्वेने सोडलेल्या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल झाले.  काही प्रवाशांनी अनेक प्रयत्न करूनही प्रतीक्षा यादीतच त्यांचे नाव राहिले. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे आरक्षण काही मिनिटात फुल झाले होते.  मागील वर्षी तिकीट आरक्षणात काळाबाजार झाल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. यंदाच्या तिकीट आरक्षणही काही मिनिटात फुल झाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. 

तिकीट आरक्षणाची चौकशी करा

दरम्यान, गेल्या वर्षी गणेशोत्सवाची तिकिटे काढताना कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांतच एक हजारांपार गेली होती. त्यानंतर तिकीट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त केली होती. तपासाअंती यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले होते. यंदाही तिकीट आरक्षण काही मिनिटात फुल झाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. तिकीट आरक्षणाची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा, अशी मागणी आता प्रवासी संघटनांकडून होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Ganpati trains in Konkan: मोठी बातमी! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष गाड्या, कोणती ट्रेन कुठून सुटणार? जाणून घ्या वेळापत्रक

गणेशोत्सव होणार गोड! सरकारकडून या दिवशी मिळणार आनंदाचा शिधा, ५६२ कोटींचा खर्च

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vistara flight Mumbai to Frankfurt : बॉम्बच्या धमकीचा मेसेज मिळताच मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारं विमान तुर्कीला वळवलं
बॉम्बच्या धमकीचा मेसेज मिळताच मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारं विमान तुर्कीला वळवलं
Samarjeetsinh Ghatge Meets Raju Shetti : समरजितसिंह घाटगेंच्या भेटीचा सिलसिला सुरुच; आता 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी पोहोचले
समरजितसिंह घाटगेंच्या भेटीचा सिलसिला सुरुच; आता 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी पोहोचले
Indian Army : भारतीय सैन्यात पेन्शनचे नियम बदलणार? सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी नियम लागू करण्याची तयारी!
भारतीय सैन्यात पेन्शनचे नियम बदलणार? सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी नियम लागू करण्याची तयारी!
Kolhapur Road : कोल्हापुरात नव्हं.. खड्डेपुरात सहर्ष स्वागत, मणका मोडून मिळेल; गणरायांच्या आगमनाला उपरोधिक वास्तव!
कोल्हापुरात नव्हं.. खड्डेपुरात सहर्ष स्वागत, मणका मोडून मिळेल; गणरायांच्या आगमनाला उपरोधिक वास्तव!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour :  महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार ?Zero Hour : लातूरच्या ग्रामीण भागात पावसामुळे मोठं नुकसानABP Majha Headlines :  9 PM : 6 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Dagdusheth Ganpati : 'दगडूशेठ' कडून यंदा हिमाचलमधील मंदिराचा देखावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vistara flight Mumbai to Frankfurt : बॉम्बच्या धमकीचा मेसेज मिळताच मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारं विमान तुर्कीला वळवलं
बॉम्बच्या धमकीचा मेसेज मिळताच मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारं विमान तुर्कीला वळवलं
Samarjeetsinh Ghatge Meets Raju Shetti : समरजितसिंह घाटगेंच्या भेटीचा सिलसिला सुरुच; आता 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी पोहोचले
समरजितसिंह घाटगेंच्या भेटीचा सिलसिला सुरुच; आता 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टी यांच्या भेटीसाठी पोहोचले
Indian Army : भारतीय सैन्यात पेन्शनचे नियम बदलणार? सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी नियम लागू करण्याची तयारी!
भारतीय सैन्यात पेन्शनचे नियम बदलणार? सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी नियम लागू करण्याची तयारी!
Kolhapur Road : कोल्हापुरात नव्हं.. खड्डेपुरात सहर्ष स्वागत, मणका मोडून मिळेल; गणरायांच्या आगमनाला उपरोधिक वास्तव!
कोल्हापुरात नव्हं.. खड्डेपुरात सहर्ष स्वागत, मणका मोडून मिळेल; गणरायांच्या आगमनाला उपरोधिक वास्तव!
Gondia News :मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला; अवघ्या दोन महिन्यातच पुलाला पडल्या भेगा
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला; अवघ्या दोन महिन्यातच पुलाला पडल्या भेगा
Navnath Waghmare on Abdul Sattar : मनोज जरांगेंना पेट्या द्यायच्या आणि स्वतःची खूर्ची पक्की करण्याचा प्रयत्न; ओबीसी नेत्याचा अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप
मनोज जरांगेंना पेट्या द्यायच्या आणि स्वतःची खूर्ची पक्की करण्याचा प्रयत्न; ओबीसी नेत्याचा अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  6 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Pune News : पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोर राडा!
पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोर राडा!
Embed widget