एक्स्प्लोर

गणेशोत्सव होणार गोड! सरकारकडून या दिवशी मिळणार आनंदाचा शिधा, ५६२ कोटींचा खर्च

Aanandacha Shidha: लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमध्ये दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणार, सरकारचे आदेश

Aanandacha Shidha: राज्यातील नागरिकांसाठी गौरी-गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा मिळणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव गोड होणार असून यासासाठी ५६२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

याबाबत राज्यातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश जारी केला असून  छत्रपती संभाजीनगर  व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील द्रारिद्य्र रेषेखालील केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतींच्या दरात हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.

कधी मिळणार आनंदाचा शिधा

गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत ई- पास प्रणालीद्वारे अवघ्या १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. यावेळी द्रारिद्य्ररेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे.

किती रुपयांचा प्रस्तावित खर्च?

आनंदाचा शिधा वितरित करण्याकरता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  अंदाजित ५४३.२१ कोटी तर इतर १९.३ कोटी खर्च असा एकूण ५६२.५१ कोटी एवढा प्रस्तावित खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आनंदाचा शिधा वितरित करण्याकरता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्याकरता २१ दिवसांऐवजी ८ दिवसांचा कालावधी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

काय असणार आनंदाचा शिधा?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा नागरिकांना एक किलो चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा  शिधा देण्यात येणार आहे.

कोणाला मिळणार आनंदाचा शिधा?

राज्यातील  अत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर  व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील द्रारिद्य्र रेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  एकूण  1,70,82,086 शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त हा आनंदाचा शिधा वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

लाेकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधावाटप दोन महिने बंद करण्यात आला होता. आता गणेशोत्सवाच्या काळात तो पुन्हा सुरु करण्यात येत असून यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मतांच्या पेरणीसाठी आनंदाचा शिधा वाटप करत असल्याची टीका करण्यात आली होती. 

हेही वाचा:

अंगणवाडीतील खिचडीत आढळला मेलेला बेडूक, पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? पालक संतप्त

वेळ कमी, लाभार्थी जास्त; 'लाडकी बहीण योजने'च्या अंमलबजावणीसाठी सरकारची अशी 'आयडिया'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 02 March 2025Special Report |Sion Bridge | सायन पुलाचं काम आणखी किती थांब? स्थानिकांना वाहतूक कोंडीचा त्रासEknath Shinde on Chair टीम जुनी आहे, खुर्च्यांची अदला बदल झाली, फक्त अजितदादांची खुर्ची सेम..एकच हशाCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 7 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
Embed widget