एक्स्प्लोर

काल सदाभाऊ म्हणाले, माझ्या जीवाला पवार कुटुंबाकडून धोका, आज वळसे पाटलांनी सुरक्षा वाढवली!

Sadabhau Khot Security : पवार कुटुंबापासून मला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली.

मुंबई : सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना दिली आहे, असं वळसे पाटील म्हणाले. पवार कुटुंबापासून मला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतरा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "आम्ही नेहमीच शरद पवारांना भेटत असतो, अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असतं, त्यानुसार भेट झाली."

सदाभाऊंच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना
पवार कुटुंबापासून आम्हाला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "मला वाटत नाही की सदाभाऊंच्या जीविताला धोका आहे. तरीसुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केली आहे, त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मी आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवावी." 

सदाभाऊ खोत काय म्हणाले होते? 
सदाभाऊ खोत हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी गुरुवारी (16 जून) संध्याकाळी एका हॉटेलचालकाने त्यांना अडवून, अनेक महिन्यांपासून जेवणाचे बिल रखडल्याचा आरोप केला होता. मात्र सदाभाऊ खोत यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची चाल असल्याचा आरोप केला होता. टोमॅटोसारख्या गालाचा राष्ट्रवादीचा नेता यामागे होता. तसंच राष्ट्रवादी पक्षापासून विशेषत: पवार कुटुंबापासून माझ्या जीवाला धोका आहे असा आरोपही केला होता.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार अनावधनाने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात शुक्रवारी संध्याकाळी एक कार घुसली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. याविषयी माहिती देताना गृहमंत्री म्हणाले की, "ती घटना अनावधानाने घडली. संपूर्ण चौकशी केली. त्यामध्ये कोणताही दुसरा प्रकार नाही, त्यामुळे त्याला गांभीर्याने घेण्याचं कारण नाही. पोलिस यंत्रणा कुठे कमी पडली का याचा तपास करु." 

'महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील'
विधानपरिषदेत आमचे सगळे उमदेवार निवडून येतील, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. "महाविकास आघाडीचे पक्ष वेगवेगळी तयारी करत असले तरी यावेळी आमचे सहा उमेदवार निवडून येतील. राज्यसभेला परिस्थिती वेगळी होती, यावेळी परिस्थिती वेगळी आहे," असं ते म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget