एक्स्प्लोर

Badlapur School case in HC: लोक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का? बदलापूर अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने सरकारला झाडलं, पोलिसांनाही झाप झाप झापलं

Badlapur crime: बदलापूर अत्याचार प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी पोलीस आणि राज्य सरकारच्या कृतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. शाळेवर कारवाई करणार असल्याची राज्य सरकारची कोर्टात माहिती

मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी झाली. तेव्हा  उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलीस आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे, अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला चपराक लगावली.

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. तपास विशेष पथकाकडे देण्यापूर्वी बदलापूर पोलीसांनी (Badlapur Police) काय केलं? त्याची कागदपत्रं कुठे आहेत? पीडीत मुलींचं समुपदेशन केलंत का?, असे सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारले.

यावर राज्य सरकारच्या वकिलांनी म्हटले की, पहिल्या पीडीत मुलीचं समुपदेशन झालेलं आहे, दुसऱ्या मुलीचं समुपदेशन सुरू आहे. घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी झाली, पालक 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात आले. याप्रकरणी काल, 21 ऑगस्ट रोजी एसआयटी स्थापन झाली आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार, असे महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.

यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, प्रश्न शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा आहे. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे, असे खडे बोल हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले.

न्यायमूर्तींच्या प्रश्नांवर महाअधिवक्ता निरुत्तर

न्यायमूर्तींनी महाअधिवक्ता यांच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. पीडीत मुलांच्या पालकांचे जबाब नोंदवलेत का? बदलापूर पोलीसांनी केलं काय?, असे सवाल विचारताच महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ निरुत्तर झाल्याचे दिसून आले. बदलापूर पोलिसांनी याप्रकरणात काहीच कारवाई केल्याचे दिसत नाही. इतक्या गंभीर प्रकरणात पोलीसांचा हा अक्षम्य हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कारवाईचे आदेश देताना आम्ही मागेपुढे पाहणार नाही,  असा इशाराही खंडपीठाने राज्य सरकारला दिला. त्यामुळे आता यावर राज्य सरकार मंगळवारी दुपारी होणाऱ्या सुनावणीत काय बाजू मांडणार, हे पाहावे लागेल.

VIDEO: बदलापूर अत्याचार प्रकरणात राज्य सरकारवर हायकोर्टाचे ताशेरे

आणखी वाचा

बदलापूर अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा सनसनाटी दावा, माझ्या मुलाला...

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची खरंच तीन लग्न झालीत का? वडिलांचा खळबळजनक दावा, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 11 November 2024PM Modi Speech Mumbai  : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभाAjit Pawar Baramati : साहेब नसतील तर तालुका कोण बघणार?अजितदादांचा बारामतीकरांना सवालVidhan Sabha News : राहुल गांधींचा दौरा ते खोतकर-दानवे भेट; राजकीय घडामोडींचा आढावा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?
मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?
Uddhav Thackeray : माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
Maharashtra Assembly Elections 2024 : एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
Embed widget