एक्स्प्लोर

Ghatkopar Hoarding : भूखंड महसूल विभागाचा, वापर वाणिज्य कामासाठी; होर्डिंग पडलेला घाटकोपरचा पेट्रोल पंपच अनधिकृत असल्याची माहिती

Ghatkopar Hoarding Collapsed Case : पोलीस गृहनिर्माण महामंडळाने वेळोवेळी पोलीस महासंचालक आणि रेल्वे पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत पेट्रोल पंपाच्या बांधकामावर हरकत घेतली होती.

मुंबई: घाटकोपरमध्ये ज्या पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग पडून अपघात झाला (Ghatkopar Hoarding Collapsed Case) तो संपूर्ण पंपच अनधिकृत असल्याचं समोर येतंय. घाटकोपरच्या रेल्वे पोलीस वसाहतीच्या भूखंडावरील पेट्रोल पंप अनधिकृत असल्याची माहिती असून  सदरची जागा शासन निर्णयानुसार शैक्षणिक अथवा प्रशासकीय इमारतीसाठी असल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल पंपासाठी लागणारे अंतिम ना हरकत प्रमाण पत्र (OC) नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे एकूणच या पेट्रोलपंपावरून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

परवानगी न घेता वाणिज्य कामासाठी वापर

हा भूखंड गृहखात्याचा असून महसूल विभागाची परवानगी न घेता त्या ठिकाणी वाणिज्य कामासाठी वापरला जात होता. त्याबाबत पोलीस गृहनिर्माण महामंडळाला अहवाल मागवला होता. या भूखंडावर पेट्रोल पंप कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राची विचारणा करण्यात आली होती. मात्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाने वेळोवेळी पोलीस महासंचालक आणि रेल्वे पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत सुरू असलेल्या पेट्रोल पंप बांधकामावर हरकत घेतली होती. हे बांधकाम थांबवण्याबाबत पोलिस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांनी गृहविभागाला पत्र व्यवहार करून परवानगी नाकारल्याचा अभिप्राय देण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. 

पेट्रोल पंपासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' प्रदान करण्यास नकार

शासन निर्णयानुसार या भूखंडाचा वापर प्रशासकीय इमारत, शैक्षणिक इमारत आणि निवासी इमारत बांधण्याबारत मर्यादीत ठेवण्यात आला होता. या भूखंडावर पोलिस निवासांची कमतरता लक्षात घेता सेवा निवासस्थाने बांधण्याची नितांत आवश्यकता असून अवती भवती पोलिस वसाहतीत कुटुंब रहात असल्याने पेट्रोल पंपासाठी मागण्यात आलेली 'ना हरकत प्रमाणपत्र' प्रदान करणे शक्य नसल्याचा अभिप्राय दिला होता.

मात्र तरीही भूखंडावर शासनाची ना हरकत परवानगी आणि पोलिस गृहनिर्माण मंडळाचा अभिप्राय प्राप्त न करता पेट्रोल पंपाचे काम सुरू करण्यात आले होते. हे बांधकाम थांबवण्याबाबत पोलिस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांनी गृहविभागाला पत्र व्यवहार करून परवानगी नाकारल्याचा अभिप्राय देण्यात आला होता.

हरकत घेतल्यानंतरही पेट्रोल पंपाला परवानगी

पोलिस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांनी हरकत घेतल्यानंतरही तत्कालीन पोलिस आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन पोलिस महासंचालक यांनी या पट्रोल पंपाला परवानगी दिली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. 

विशेष म्हणजे या पेट्रोल पंपासाठी लागणारे अंतिम ना हरकत प्रमाण पत्र (OC) नसल्याचेही समोर आले आहे. 

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget