एक्स्प्लोर

Travel with Corona | हरियाणा टू लातूर विथ कोरोना... निलंग्यातील 'त्या' 12 जणांची कहाणी

फिरोजपूर झिरगाच्या तहसीलदाराचा 'मानवतावादी दृष्टीकोन' तीन राज्य आणि अनेक जिल्ह्याला भोवला. प्रवासासाठी तसा कोणताही पास देता येत नाही. यातील सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी हालचालू सुरू झाल्यात.

लातूर : जिल्ह्यातील निलंगा येथिल एका धार्मिक स्थळात बारा परप्रांतीय प्रवासी मुक्कामी आले होते. हे सर्व लोक तबलीग जमातशी संबंधीत आहेत. त्यातील आठ लोक हे कोरोना बाधित असल्याचे तपासणीत समोर आले आहे. यामुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. हे बारा प्रवासी हे आंध्रप्रदेश येथील करनुल भागातील आहेत. ते पंधरा डिसेंबरपासून हरियाणा भागात धर्म प्रसारासाठी बाहेर पडले होते. 30 मार्चला हरियाणा येथील नहू जिल्ह्यातील फिरोजपुर हिरका भागातील तहसीलदार याचे पास घेऊन ते निघाले. दोन खासगी गाड्यातून त्यांनी महाराष्ट्रातील धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि निलंगा असा प्रवास केला. निलंगा येथे आल्यावर ते वाहन चालक वापस गेले. याची माहिती प्रशासनास मिळाल्यानंतर तात्काळ त्याची तपासणी करण्यात आली. बारा जनांपैकी आठ लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. यात लॉक डाऊन असताना त्यांना प्रवास करण्याचा पास कसा देण्यात आला आहे, हाच यात प्रश्न निर्माण झाला आहे. आता या प्रकरणात सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र सरकार प्रयास करत आहे.

हा पास कसा देण्यात आला यावर मागील दोन दिवसांपासून प्रशासन फक्त चर्चाच करत आहे. मात्र, दोन दिवसानंतर प्रशासनास लक्षात आले की असा पास देता येत नाही. आता कारवाई करण्यात येणार आहे म्हणे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठीच लॉकडाऊन करून जेथे आहेत तेथे थांबावे असा आदेश देशाच्या पंतप्रधान यांनीच दिला होता. असे असताना मानवतावादी दृष्टिकोन लक्षात घेऊन फिरोजपुर झिरखा येथील तहसीलदार यांनी त्या बारा जणांना प्रावसाचा पास दिला. जो देता येत नाही. त्यांनी हरियाणा ते निलंगा प्रवास करताना कोरोनाचा संसर्ग वाढवला आहे. यामुळे सर्व ठिकाणच्या प्रशासन कामाला लागले आहे. लॉक डाऊनच्या उद्देशलाच यामुळे तडा गेला आहे. ते ज्या ज्या भागात गेले आहेत, त्या त्या भागातील लोकांच्या जीविताशी ते खेळले आहेत. त्याच्यावर तशाच प्रकारचा गुन्हा दाखल करावा. पास देणाऱ्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येणार आहे, असे मत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना 'मातोश्री'च्या उंबरठ्यावर, मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण 

कसा झाला प्रवास ?

  • 15 डिसेंबर - नंदयळ जिल्हा करनुल येथे बारा लोक एकत्र आली
  • 16 डिसेंबर ते 12 जानेवारी - गिदलूर जिल्हा करनुल येथील नुराणी मशिदीत मुक्काम
  • 12 जानेवारी ते 14 जानेवारी - आदीलाबाद जिल्ह्यातील निर्मल येथील इस्तमात सहभाग
  • 14 जानेवारी ते 1 मार्च - इस्ट गोदावरी आंध्रप्रदेश येथील राजमंदिरी भागातील सर्कस मशिदीत मुक्काम
  • 1 मार्च ते 24 मार्च - हरियाणा राज्यातील नहू जिल्ह्यातील फिरजपुर झिरगा येथील सिद्रावट मशिदीत मुक्काम, हे गाव राजस्थान आणि
  • हरियाणाच्या सीमावर्ती भागात आहे.
  • 24 मार्च ते 30 मार्च - काळात नदयाळ येथे येण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुक केले. मात्र, रेल्वे सेवा बंद झाली.
  • 30 मार्च - उपविभागीत अधिकारी फिरजपुर यांच्या पासच्या आधारे एक स्कार्पिओ आणि एक झायलो गाडीकरून प्रवास सुरु केला.
  • मथुरा, आग्रा, ग्वाल्हेर, इंदोर, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूरमार्गे लातूर प्रवास केला.
  • 1 एप्रिल - तुळजापूर नाकेबंदीत गाडी अडविण्यात आली. तुळजापूर उस्मानाबाद रस्त्यावरील एका धाब्यावर जेवण घेतले. धाब्यावर एक व्यक्ती संपर्कात आला.
  • 2 एप्रिल - दुपारी दोन वाजता उस्मानाबाद प्रशासनाने जाण्यास परवानगी दिली. मात्र, लोहारा येथे गाडी अडविण्यात आली, चौकशी करून गाडी पुढे जाऊ दिली.
  • 2 एप्रिल - रात्री बारा वाजता निलंगा येथे माहितीतील व्यक्तीस संपर्क करून औरंगपूरा येथील उस्मानगी मशीदत मुक्काम.
  • 03 एप्रिल - प्रशासनास माहिती
मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर उतरणं हा बेजबाबदारपणाचा कळस : अजित पवार या प्रवासात त्यांनी कुठे कुठे मुक्काम केला. ते कोणत्या लोकांच्या संपर्कात आले त्याची माहिती प्रशासन घेत आहे. एका गाडीचा पास असताना दोन गाड्या आणण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद सोडता त्यांची गाडीला कुठे ही अडविण्यात आले नाही. रस्त्यावरील एकाही नाकेबंदीत कोणत्याही अधिकाऱ्यास, कर्मचाऱ्यास साधी चौकशी करावी वाटली नाही. प्रवास करतायत यामुळे त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली नाही. यामुळे हा संसर्गाचा प्रवास रस्त्यातील सर्वांसाठीच धोकादायक ठरला आहे.

पास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा लातूरच्या जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी नहू येथील जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले आहे. त्यात स्पष्ठ करण्यात आले आहे की पंतप्रधान यांच्या आदेशाने देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. असे असताना मानवतावादी दृष्टीकोन ठेवून यांना प्रवासची परवानगी देणार पास देण्यात आला आहे. ते आजारी नव्हते किंवा काही महत्वाचे कामही नव्हते. तरी पास देण्यात आला. येताना त्यांनी अनेक ठिकाणी संपर्क केला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. लोकांच्या जीवितास हानी होईल असे कृत्य त्यांनी केले आहे. याची जेवढी जबाबदारी त्या प्रवासी जमात तबलीगच्या यात्रेकरूंची आहे. तेवढीच पास देणाऱ्या अधिकाऱ्याची आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, असं पत्रात म्हटलंय.

Corona | कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या पोलीस कुटुंबाला 50 लाख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MHADA Nashik : नाशिककरांनो! स्वस्तात फ्लॅट हवाय? म्हाडाकडून 493 घरांसाठी मोठी घोषणा, घरे कुठे अन् किंमती किती? जाणून घ्या सविस्तर
नाशिककरांनो! स्वस्तात फ्लॅट हवाय? म्हाडाकडून 493 घरांसाठी मोठी घोषणा, घरे कुठे अन् किंमती किती? जाणून घ्या सविस्तर
Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
New RSS Head Quarters in Delhi : दिल्लीत आरएसएसची आलिशान इमारत, 150 कोटींचा खर्च, पावणे चार एकरातील 12 मजली टॉवर्समध्ये तब्बल 300 खोल्या अन् बरंच काही
Video : दिल्लीत आरएसएसची आलिशान इमारत, 150 कोटींचा खर्च, पावणे चार एकरातील 12 मजली टॉवर्समध्ये तब्बल 300 खोल्या अन् बरंच काही
Operation Tiger: ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी जेवले, एकजण एकनाथरावांच्या सत्काराला, ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याचे संकेत?
ठाकरेंचे 6 खासदार गळाला, एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर सक्सेसफुल? 'त्या' दोन घटनांमुळे संशय बळावला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladka Bhau Yojana Sangli : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची मागणी काय? सांगलीत मेळवाAaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरंABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 13 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सJaya Bachchan Rajya sabaha Video : राज्यसभेत खडाजंगी! जया बच्चन भयानक संतापल्या..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MHADA Nashik : नाशिककरांनो! स्वस्तात फ्लॅट हवाय? म्हाडाकडून 493 घरांसाठी मोठी घोषणा, घरे कुठे अन् किंमती किती? जाणून घ्या सविस्तर
नाशिककरांनो! स्वस्तात फ्लॅट हवाय? म्हाडाकडून 493 घरांसाठी मोठी घोषणा, घरे कुठे अन् किंमती किती? जाणून घ्या सविस्तर
Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
New RSS Head Quarters in Delhi : दिल्लीत आरएसएसची आलिशान इमारत, 150 कोटींचा खर्च, पावणे चार एकरातील 12 मजली टॉवर्समध्ये तब्बल 300 खोल्या अन् बरंच काही
Video : दिल्लीत आरएसएसची आलिशान इमारत, 150 कोटींचा खर्च, पावणे चार एकरातील 12 मजली टॉवर्समध्ये तब्बल 300 खोल्या अन् बरंच काही
Operation Tiger: ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी जेवले, एकजण एकनाथरावांच्या सत्काराला, ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याचे संकेत?
ठाकरेंचे 6 खासदार गळाला, एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर सक्सेसफुल? 'त्या' दोन घटनांमुळे संशय बळावला
मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
Nashik Crime : नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
PM Modi Flight Entered the Pakistani Airspace : पॅरिसला जाताना पंतप्रधान मोदींचे विमानाचे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाऊण तास उड्डाण
पॅरिसला जाताना पंतप्रधान मोदींचे विमानाचे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाऊण तास उड्डाण
Aaditya Thackeray : शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
Embed widget