एक्स्प्लोर

Sharad Pawar: शरद पवार थेट MPSC विद्यार्थी आंदोलनाच्या गराड्यात, म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्तच, येत्या दोन दिवसात.... 

MPSC च्या मुख्य परीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम हा 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरु केलं असून आज त्याचा दुसरा दिवस आहे.

MPSC Student Protest in Pune : एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या योग्यच असून आपण त्यांच्या पाठिशी आहोत, येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार थेट विद्यार्थ्यांमध्ये सामील झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शरद पवारांच्या आगमनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच उत्साह संचारला आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीनं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

यावेळी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, "एका विद्यापीठाचे कुलगुरू मला काल भेटायला आले होते. त्यांनी एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील विद्यार्थी हे याच्याविरोधात गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. याचा परिणाम विद्यापीठाच्या कामावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून आपण मुख्यमंत्र्याची या प्रकरणी भेट घेऊन एक बैठक घ्या. अशा प्रकारचं लेखी निवेदनही त्यांनी दिलं. या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचं आश्वासन दिलं."

विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाने आपल्यासोबत यावं असंही शरद पवारांनी सांगितलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळे तुमची बाजू मांडणं आवश्यक आहे असंही शरद पवार म्हणाले. 

पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ पवारांसोबत जाणार

शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांचं शिष्टमंडळ हे शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. या शिष्टमंडळात कोण असणार याची नावंही विद्यार्थ्यांनी जाहीर केली.

यावेळी शरद पवारांना विद्यार्थ्यांनी जागा करून दिली आणि शरद पवार विद्यार्थी आंदोलनच्या मधोमध पोहोचले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना खुर्ची देऊ केली पण पवारांनी ती नाकारली आणि उभं राहून संवाद साधला.

एमपीएससची बदललेला अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा यासाठी विद्यार्थ्यानी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल रात्री या आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रीट लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या, त्यावेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात आंदोलन कायम ठेवलं. या आधी या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, रोहित पाटील, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, आमदार सत्यजीत तांबे यांनीही भेट दिली आहे. 

सुषमा अंधारेंची राज्य सरकारवर टीका

या आंदोलनाला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भेट दिली. देशाला आधार देणाऱ्या भावी पीढीला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैवी असून राज्य सरकार यावर निर्णय घेत नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या. आजारी असलेल्या बापट साहेबांना भाजप प्रचारात उतरवू शकतात मग या विद्यार्थ्यांच्याही जिवाशी खेळायला ते कमी करणार नाहीत असं सुषमा अंधारे म्हणाल्या. 

सोमवारपासून  पुण्यातल्या (Pune News) झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात  एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरं आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र हा निर्णय घेऊन घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. 

मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना (Corona) असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पॅटर्न (New MPSC Pattern 2025)  लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

'या' आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा. नवा पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये. अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा अशा मागण्या या विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत. नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रमाप्रमाणे असल्याने त्यासाठी मराठीतून पुस्तकं उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget