एक्स्प्लोर

लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.

Aditi Tatkare: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) हफ्ता कधी मिळणार याकडे राज्यातील महिलांचं लक्ष लागलेलं असताना हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजनेची रक्कम बहिणींच्या खात्यात वर्ग केली जाईल असं म्हटलं होतं.त्यानुसार, याच वर्षी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हफ्ता मिळणार आहे. हा हफ्ता देण्याची प्रक्रीया आजपासून सुरु झाली असून विधानसभा निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रीया आजपासून पुन्हा सुरु झाल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. X माध्यमावर याविषयी त्यांनी ही माहिती दिली. महिलांना आर्थिक आधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना असल्याचं सांगत टप्प्याटप्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात केल्याचं त्यांनी म्हटलंय.

काय म्हणाल्या अदिती तटकरे?

'महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ( @Dev_Fadnavis) , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे (@mieknathshinde) आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार (@AjitPawarSpeaks) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.'

ही योजना का विशेष आहे?

1) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.

2) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.

3) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.

मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा आहे.

डिसेंबरच्या हप्त्यासाठी  3500 कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं  7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.  

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या  बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे. 

हेही वाचा:

Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात, डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग, 1500 की 2100 रुपये मिळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, 'आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू'
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीचे धाराशिव कनेक्शन; आरोपींची संख्या 5 वर
सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीला धाराशिवमधून अटक; आरोपींची संख्या 5 वर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Cyber Crime : पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; वर्षभरात 669 कोटींचा फ्राॅडRohit Patil Radhanagari : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञIndapur Pune : वडिलांची आठवण असलेलं घर जमीनदोस्त न करता बाजूला सारण्याचा प्रयोगRahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भाजी मंडईत महिलांसोबत चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, 'आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू'
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीचे धाराशिव कनेक्शन; आरोपींची संख्या 5 वर
सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीला धाराशिवमधून अटक; आरोपींची संख्या 5 वर
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
नाताळ..लग्नसराईमुळे तुळजाभवानी चरणी भक्तांची मांदियाळी, तुळजापुरात राज्यासह परराज्यातून भाविक दाखल
नाताळ..लग्नसराईमुळे तुळजाभवानी चरणी भक्तांची मांदियाळी, तुळजापुरात राज्यासह परराज्यातून भाविक दाखल
Pune Accident News : वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Embed widget