एक्स्प्लोर

Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीचे धाराशिव कनेक्शन; आरोपींची संख्या 5 वर

Satish Wagh Murder : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Satish Wagh Murder Case : पुण्यातील भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतीश सादबा वाघ (वय 55, रा. मांजरी बुद्रुक) यांचं अपहरण करून निर्घृन खून करण्यात आला. सतीश वाघ करण्यासाठी भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  आत्तापर्यंत चार जणांना अटक केली ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली होती. आता प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेने फरार आरोपी आतिश जाधव यास धाराशिव येथून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन आता धाराशिवपर्यंत जाऊन पोहचले असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हत्या प्रकरणात फरार आरोपी आतिश जाधवला धाराशिवमधील कळंब येथून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि धाराशिव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी आतिश हा धाराशिवमधील उंबरे कोटा येथील रहिवाशी आहे. योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना 9 डिसेंबरला अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी अगोदर चार आरोपी अटकेत होते. त्यानंतर तपासाचे धागेदोरे आता धाराशिवपर्यंत जाऊन पोहचले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता गुन्हे शाखा करत आहे.  

नेमकी घटना कशी घडली?

सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून अज्ञान स्थळी नेण्यात आलं. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला होता. 

सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत. सतीश वाघ हे शेतकरी असून हडपसर परिसरातील मांजरी भागात त्यांची शेती आहे, त्यांचा व्यवसाय देखील आहे. काही हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण झालं होतं. पुण्यापासून सुमारे 34 किलोमीटरवर असलेल्या उरुळी कांचनच्या पुढे शिंदवणे घाटात त्यांचा हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. मांजरी ते यवत या प्रवासादरम्यानच वाघ यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News : वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramtek Bangalow : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालाChhatrapati Sambhajinagar : मंत्री होताच पदाचा रूबाब; नवी मुंबई पोलिसांची झाडाझडतीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News : वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Embed widget