एक्स्प्लोर

पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार

संतोष देशमुख यांची लहान मुलगी रडताना दिसते, बोलताना दिसते तेव्हा आपण नागरिक म्हणून काय करतो याची मला खंत वाटते.

नाशिक : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन आता बीडमधील (Beed) जनता रस्त्यावर उतरत आहे. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र 28 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर, या आंदोलनात राज्यातील अनेक भागातून नागरिक सहभागी होणार आहे. काही वारकरी मंडळीही या आंदोलनात सहभागी होत बीडमधील दहशतीविरुद्ध आवाज उठवत आहेत. तसेच, संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी देखील करणार आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) याही बीडमध्ये जाऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत. एबीपी माझाशी बोलताना दमानिया यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्याची मागणी केलीय. तसेच, या हत्याप्रकरणावर पंकजा मुंडे गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. 

संतोष देशमुख यांची लहान मुलगी रडताना दिसते, बोलताना दिसते तेव्हा आपण नागरिक म्हणून काय करतो याची मला खंत वाटते. चांगल्या लोकांनी जर घरात बसून राहिलं तर अशी दहशत निर्माण करणाऱ्या लोकांविरुद्ध कुणीच कसं बोलणार नाही. त्यामुळे, मी ठरवलंय की, 28 डिसेंबरला मी बीडमध्ये जाणार आहे, तिथं जी पदयात्रा आहे, त्यामध्ये वारकरी मंडळीही येणार आहे. मी पदयात्रेत जाऊन यांचे जे जे काळे कारनामे आहेत, त्यांविरुद्ध आवाज उठवणार आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करुन लढा उभा करणं हे मी माझं कर्तव्य समजते, असे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. 

पंकजा मुंडे गप्प का?

मी पंकजा मुंडेंना मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही गप्प का? तुम्ही बीडच्या मंत्री आहात. ज्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही भगवान गडावरुन बोलला होतात. त्या व्यक्तीचा खंडणीच्या गुन्ह्यात सरळ सरळ सहभाग आहे. याशिवाय संतोष देशमुख खूनप्रकरणातही त्याचा हात आहे की नाही, यावर तुम्ही चकार शब्दही बोलत नाहीत. बीडच्या जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही यावर भूमिका घ्यायला हवी, असेही अंजली दमानिया यांनी म्हटलं. संतोष देशमुख यांच्या शवविच्छदेनाच्या अहवालानंतर त्यांचे फोटोही समोर आले, ते फोटो पाहून थरकाप उडाला. त्यामुळे, प्रत्येक जिल्ह्यात हे घाणीचं राजकारण, दहशतीचं राजकारण होत आहे ते थांबायला हवं. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं सख्य कसं आहे समोर आलंय. वाल्मिक कराड यांचे फडणवीसांपासून ते रोहित पवारांसोबत फोटो आले आहेत. या वाल्मिक कराडची बीडमध्ये दहशत आहे हे सगळेच सांगतात. मग, ही कसली दगडाची लोकशाही का? असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. 

भुजबळ भाजपात प्रवेश करणार

भुजबळ हे भाजपमध्ये जाणार हे मी आज नाही, तर फेब्रुवारी महिन्यातच मी सांगितलं होतं. आता, ते मस्त नाटक रंगवलं आहे, त्यानुसार भुजबळांना मंत्रिपद न देणं. मग त्यांनी थोडंसं चिडल्यासारखं करणं, विशेष म्हणजे अजित पवार व सुनील तटकरे यांनी देखील भुजबळांची भेट घेतली नाही. मग भुजबळांनी एक मेळावा घेऊन पुन्हा फडणवीसांना भेटायला गेले हे सगळं रंगवलेलं आहे. तेव्हा मी ट्विट केल्यामुळे हे लांबणीवर पडलं होतं. मात्र, हे आता भाजपमध्ये जात आहेत, कारण भाजपलाही एक ओबीसी चेहरा त्यानिमित्ताने मिळेल, असेही अंजली दमानिया यांनी म्हटलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP MajhaAmol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषणWalmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Embed widget