MPSC: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच; आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद, मोबाईल टॉर्च लावून आंदोलन
MPSC Student Protest: पुण्यातल्या (Pune News) झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे

MPSC Student Protest in Pune : पुणे : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं (Pune MPSC Student Protest) आंदोलन सुरुच आहे. दरम्यान आंदोलनस्थळावरील स्ट्रीट लाईट काल बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च लावत आंदोलन सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं. नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. आजही पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन सुरुच आहे. सोमवारी काळोख्या अंधारात देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होतं.
सोमवारपासून पुण्यातल्या (Pune News) झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरं आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र हा निर्णय घेऊन घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी एमपीएससीच्या (MPSC) संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. तर राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणचा स्ट्रीट लाईट बंद करण्यात आलेल्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांचं स्वागत विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या टॉर्च (Mobile Torch) लावून केल्याचे पाहायला मिळालं.
मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना (Corona) असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पॅटर्न (New MPSC Pattern 2025) लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'या' आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
- नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा.
- पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये.
- अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा.
- नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रवार आधारित आहे.
- त्यामुळे पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यात सुधारणा करण्यात यावी
महत्त्वाच्या इतर बातम्या :
MPSC : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार, रोहित पवार म्हणतात...
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
