मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, तब्बल 20 ते 25 मिनटे चर्चा
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सिल्व्हर ओक या निवासस्थानी या दोघांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली.
Sanjay Raut Meet Sharad Pawar: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी या दोघांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली आहे. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पवारांची भेट घेवून संजय राऊत यांनी चर्चा केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मविआचे भवितव्य काय असणार? याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळं महाविकास आघाडी एकत्र राहणार की नाही? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. दरम्यान, अशातच संजय राऊत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावला. यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.
कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो
नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी घोषणा त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांची भेट का घेतली?
पवार साहेब हे आमचे महाविकास आघाडीचे आणि India Alliance चे नेते आहेत. देशाचे गृहमंत्री काल महाराष्ट्रात आले आणि त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या प्रकारे प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल आमची चर्चा झाली. मला वाटले की त्यांना जाऊन भेटावे. या मागचे कारण समजून घ्यावे. जनसंघ आणि पवार साहेबांचे संबंध अमित शाह यांना कळणार नाहीत. आधी भाजप आणि बाळासाहेबांचे काय संबंध होते, यावर अमित शाह यांनी संशोधन करावं असेही संजय राऊत म्हणाले. अमित शाह हे पक्षाचे नेते आहेत, देशाचे नेते नाहीत असा टोला राऊतांनी लगावला. तुम्ही कसे जिंकलात हे बघण्यासाठी मरकडवाडीत जा आणि तुम्ही काय घोटाळे केले ते समजून घ्या असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
उद्धव ठाकरेंनी मविआ का सोडली, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं राज'कारण'; आदित्य ठाकरेंचं घेतलं नाव