सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Soybean : सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना केली आहे.
Soybean : सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना केली आहे. फडणवीस यांनी मंत्री चौहन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवस मुदतवाढ द्यावी असी मागणी त्यांनी केवली आहे. आता त्यांच्या या मागणीवर कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान काय निर्णय घेणार हे पाहमं महत्वाचं ठरणार आहे.
नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीची तयारी ऑक्टोबरमध्येच पूर्ण करण्याच्या फडणवीसांची सूचना
दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन विभागाकडून 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी. राज्यातील चारही विभगात उभारण्यात येणाऱ्या ऍग्रो लोगिस्टीक हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जास्त मागणी ही आहे. त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री
राज्यात काही ठिकाणी हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तरी सर्व बाजार समित्यांवर ही केंद्रे नसल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन वाहून नेण्यासाठी मोठा खर्च होत आहे. वाहतुकीचा खर्च न परवडल्यामुळे शेतकरी आपले सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विकत आहेत. राज्य व केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून राज्यभरातील सर्व बाजार समित्यांमध्ये सरकारी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात सोयाबीनला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका भाषणात ‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र, तेवढा दर मिळत नाही. याच मुद्यावरुन किसान सभेनं टीका केली आहे.