Scholarship Result: पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, पाचवीचे 23.90 टक्के तर आठवीचे 12.53 टक्के विद्यार्थी पात्र
राज्यभरातील इयत्ता पाचवीच्या एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 35,034 विद्यार्थी पात्र ठरले आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल (Scholarship Result ) मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी, तर आठवीचे 12.53 टक्के विद्यार्थी (Fifth and Eighth Class Scholarship Result ) शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे
राज्यभरातील इयत्ता पाचवीच्या एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 35,034 विद्यार्थी पात्र ठरले आहे. राज्य परीक्षा परिषदेने 7 नोव्हेंबरला झालेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर केला होता. त्यानंतर 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान शाळेकडून गुण पडताळणीसाठीच्या अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची छाननी करून मंगळवारी रात्री हा निकाल जाहीर करण्यात आला आहे
शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉग इनमधून; तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून दिल्या आला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर एकीकडे दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा आणि दुसरीकडे टीईटी परीक्षेतील गैरप्रकार, यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या कंपनीला द्यावी? असा प्रश्न परीक्षा परिषदेसमोर होता. मात्र सरकारने विनर कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना दिली.
नाशिक जिल्ह्यातील हजारो विदयार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकली
राज्यभरातील अनुसूचित जाती- जमाती, तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. मध्यंतरी 2020 ते 2021 या कालावधीत कोरोनाने थैमान घातले. यामुळे शाळा महाविद्यालये बंद होती. मात्र शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु होता. या काळात विदयार्थी आर्थिक अडचणीत असताना त्यांनी प्रवेश घेत शैक्षणिक वर्ष सुरु ठेवले. शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीपासून जिल्ह्यातील 1700 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे आकडेवारी समोर आली आहे.
संबंधित बातम्या :
Nashik Students Scholarship : नाशिक जिल्ह्यातील हजारो विदयार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकली कुठे, मासिक निर्वाहभत्ताही प्रलंबित!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
