Laxman Utekar apologies : शिर्के घराण्याने दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर लक्ष्मण उतेकरांनी माफी मागितली, काय काय म्हणाले?
Laxman Utekar apologies : शिर्के घराण्याने दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर लक्ष्मण उतेकरांनी माफी मागितली, काय काय म्हणाले?

Laxman Utekar apologies : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. सुरुवातीला संभाजी महाराज लेझीम खेळत असताना दाखवल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी तो सीन हटवला. दरम्यान सिनेमा रिलीज झाल्यानंतर आणखी एक वाद समोर आलाय. छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्याची मुघलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी मदत केल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे शिर्के घराण्याने संताप व्यक्त केला. छावा सिनेमातून आमची बदनामी होत आहे. शिर्के घराण्याला बदनाम करणारे सीन हटवा अन्यथा दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिर्के घराण्याने केली होती. त्यानंतर आता छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितली आहे.
लक्ष्मण उतेकर काय काय म्हणाले?
लक्ष्मण उतेकर म्हणाले, आदरणीय भूषणजी पहिल्यांदा तर खूप सॉरी मी तुमचा फोन काल उचलला नाही. कारण मी रेंज नसलेल्या भागात होतो. मी तुमची पत्रकार परिषद पाहिली. तुमचा मेसेजही मी वाचला. सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो. जर नकळत तुमच्या भावना दुखावला गेल्या असतील. सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो, त्यामध्ये सुरुवातीलाच लिहिलं आहे की, हा सिनेमा छावा या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली होती. त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा छावा कादंबरीमध्ये लिहिलंय तसंच आम्ही रंगवण्याचा प्रयत्न केलाय.
संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा हाच सिनेमाचा उद्देश - लक्ष्मण उतेकर
पुढे बोलताना लक्ष्मण उतेकर म्हणाले, कादंबरी म्हणजे शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट लोकांना दाखवला जातो. मात्र, माहिती तीच असते. मी दिग्दर्शक म्हणून मी काहीही ट्वीस्ट केलेला नाही. छावामध्ये गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के, त्यांचं कुलदैवत कोणतं? या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. ते पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. कदाचित मी चुकीचा नसेल तर यापूर्वी आलेल्या टीव्ही सिरियलमध्ये देखील तसंच दाखवण्यात आलेलं होतं. आम्ही सिनेमात त्यांचं गाव देखील दाखवलेलं नाही. ते खबर मी नक्कीच घेतली आहे. कारण मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. तो उद्देश चित्रपटाचा नव्हता. पैसे कमवण्यासाठी हा सिनेमा बनवण्याची गरज नव्हती. माझ्याकडे भरपूर विषय होते. आम्ही रात्रंदिवस या सिनेमावर मेहनत घेतली आहे. संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत जावा, यासाठी आम्ही हा सिनेमा काढला. पैसे कमवण्यासाठी मी एवढी रिस्क का घेईल? हा प्रामाणिक प्रयत्न राजे समजून घेण्यासाठी केला. मी तुमची माफी मागतो, पण कोठेही तुमच्या नावाचा उल्लेख झालेला नाही. इतर कलाकृतींमध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल. तरिही तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

