Horoscope Today 23 February 2025: आज रविवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार वरदान! धनलाभ, नातेसंबंधात गोडवा; आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 22 February 2025: सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23 February 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 23 फेब्रुवारी 2025, आज रविवारचा दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आज तुमच्याशी कोणी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्यामुळे अस्वस्थ व्हाल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच टोकदार होतील, कोणतेही काम एका हेलपाट्यात होणार नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कष्टदायक दिवस आहे वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो, काही टोकाचे संघर्ष झाले, तरी तुटेपर्यंत आणू नये प्रकृती अस्वस्थ जाणवेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो त्वचारोग पायाची दुखणी त्रास देतील. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आजूबाजूला गैरसमजाचे बरेच प्रसंग निर्माण होतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो सत्वगुणाचा अतिरेक टाळायला हवा, महिलांचा दृष्टिकोन आशावादी राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो इतरांशी वागताना सामोपचाराचे तंत्र चांगले जमणार आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो परिस्थितीशी सामना करण्याची ताकद अंगी येईल, कामाचा उत्साह प्रचंड असेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो, कामामध्ये अडथळे येऊ शकतात समोरच्या पार्टीचा अंदाज घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नयेत.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो, उतावीळपणे केलेले काम अपयशाला कारणीभूत ठरेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो, निर्णयासाठी वेळ लावणे आणि चुकीचे निर्णय घेणे होऊ शकते.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>>
Weekly Horoscope 24 February to 2 March 2025: फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा 'या' 5 राशींसाठी खास! 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















