गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याला मिळाली 98 कोटी 58 लाखांची मदत
Agriculture News : सुमारे 55 कोटी रुपये निधी वितरणासाठी उपलब्ध करून दिला आहे
Snail Attack : बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात खरीप हंगामात गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांना विशेष अनुदान देण्याबाबत सरकराने आदेश काढला आहे. राज्य शासनाने या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळून 98 कोटी 58 लाख रुपये निधी मदतीपोटी मंजूर केला असून यापैकी सुमारे 55 कोटी रुपये निधी वितरणासाठी उपलब्ध करून दिला आहे.
खरीप हंगामात सोयाबीनचे पीक ऐन जोमात आल्यानंतर अनेक ठिकाणी शंखी गोगलगायीनी ते नष्ट केले होते. परिणामी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे याची नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान असून, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचे निर्देश दिले होते. यानुसार या 3 जिल्ह्यांना 98 कोटी 58 लाख रुपये निधी देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अशी मिळाली मदत...
शासनाने काढलेल्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील 3822.35 हेक्टर क्षेत्र बाधित असून, त्यासाठी 2 कोटी 59 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. तर लातूर जिल्ह्यातील 59764.30 हेक्टर क्षेत्र बाधित असून, त्यासाठी 4 कोटी 63 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. सोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील 283.83 हेक्टर क्षेत्र बाधित असून, त्यासाठी 19 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे.
धनंजय मुंडेंचा पाठपुरावा...
तर सरकारने जाहीर केलेल्या मदतीबाबत बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले आहे की, गोगलगायीनी नुकसान झालेल्या क्षेत्राची व्याप्ती 14 हजार हेक्टरच्या वर असून, राज्य शासनाने सदर क्षेत्राच्या पंचनाम्यांचे वरिष्ठ स्तरावरून फेर सर्वेक्षण करावे. तसेच कही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा समावेशक मदतीचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत हा लढा चालूच राहील, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांना विशेष अनुदान देण्याबाबत धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात आणि शासनस्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.
महत्वाच्या बातम्या...
Beed : सोयाबीन पिकावर गोगलगायींचा हल्ला; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट