एक्स्प्लोर

Beed Agriculture : अतिवृष्टी आणि गोगलगायीमुळं बीड जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान, भरपाईसाठी 5 कोटी 36 लाखांच्या निधीची मागणी

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सोयाबीनवर झालेल्या गोगलगायीच्या प्रादुर्भावाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भरपाईसाठी 5 कोटी 36 लाखांची मागणी बीड जिल्हा प्रशासनानं केली आहे.

Beed Agriculture News : अतिवृष्टीचा खूप मोठा फटका राज्यातील काही भागात बसला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सोयाबीन  (Soybean) पिकावर गोगलगायीचा (Snail) प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं पिकांच मोठं नुकसान झाल्यानं मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे देखील गोगलगायीमुळं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गोगलगायीमुळं झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पाच कोटी छत्तीस लाख रुपयांच्या निधीची मागणी बीडच्या जिल्हा प्रशासनानं केली आहे.

बाधित क्षेत्राचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवला, 13 हजार 119  शेतकऱ्यांचे नुकसान

बीड जिल्ह्यामध्ये जून आणि ऑगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे गोगलगायीमुळं देखील शेती पिकाचं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने केले असून, याच पंचनामाच्या आधारे बीडच्या जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाच कोटी छत्तीस लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्याचबरोबर विभागीय आयुक्तांना देखील 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचा अहवाल पाठवण्यात आला असून, यामध्ये 13 हजार 119 शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे.

33 टक्क्यांपेक्षा नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत

अतिवृष्टी आणि गोगलगायीमुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या पिकाला फटका बसला होता. तर गोगलगायमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद नसल्याचे कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, काही शेतकरी संघटना, राजकीय पक्षांनी सतत या नुकसान भरपाईची मागणी लावून धरली होती. त्यानंतर 33 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यामध्ये बीड, केज आणि अंबाजोगाई या तीन तालुक्यांमध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र आहे. तर गेवराई, पाटोदा, धारुर या तालुक्यात 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान न झाल्यानं हे तालुके मदतीपासून वगळण्यात आले आहेत. त्यामुळं ज्या शेतकाऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना भरपाईपोटी पाच कोटी छत्तीस लाख रुपयाच्या निधीची मागणी बीडच्या जिल्हा प्रशासनाने केली आहे.

सोयाबीनसह अन्य पिकांना गोगलगायींने मोठ्या प्रमाणात ग्रासलं आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावानं उगवलेली सोयाबीन पिकं पूर्णत: नष्ट झाली आहेत. तर सोयाबीनसह इतरही पिकांना गोगलगायीच्या नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. याबाबत कृषी आणि महसूल यंत्रणेने तत्काळ पंचनामे करुन राज्य सरकारनं संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, क्लोजर रिपोर्ट समोर येताच संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, क्लोजर रिपोर्ट समोर येताच संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian case : वडिलांच्या अफेअरने त्रस्त, दिशा सालियनने आर्थिक तणावातून जीवन संपवलं, नवीन माहिती समोरABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 28 March 2025Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर नावावरून वाद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09AM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, क्लोजर रिपोर्ट समोर येताच संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, क्लोजर रिपोर्ट समोर येताच संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
IPL 2025 SRH Vs LSG: केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
Kunal Kamra & Sushma Andhare : मोठी बातमी : कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला; आजच नोटीस धाडण्याची शक्यता, दोघांच्या अडचणी वाढणार?
कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला; आजच नोटीस धाडण्याची शक्यता, दोघांच्या अडचणी वाढणार?
Disha Salian Case : वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला पैसा देऊन थकली, मित्रांसोबतही बोलली; दिशा सालियानने आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद
वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला पैसा देऊन थकली, मित्रांसोबतही बोलली; दिशा सालियानने आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद
Embed widget