Aurangabad News: अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर; वेरूळला करणार मुक्काम
Hillary Clinton In Aurangabad: हिलरी क्लिंटन यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केलेली आहे, अशी माहिती राजशिष्टाचार विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांनी दिली.

Hillary Clinton In Aurangabad: युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या (USA) माजी प्रथम महिला हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) 7 ते 9 फेब्रुवारी, अशा दोन दिवसांच्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर येत आहेत. याच दौऱ्यात त्या वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिराला भेट देणार असून, खुलताबाद तालुक्यात त्यांचा मुक्काम करणार आहे. दरम्यान त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केलेली आहे, अशी माहिती राजशिष्टाचार विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांनी दिली.
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या माजी माजी विदेश मंत्री तथा 1993 ते 2003 काळात अमेरिकेच्या प्रथम महिला म्हणून कार्यरत राहिलेल्या हिलरी क्लिंटन या 7 फेब्रुवारीला अहमदाबाद येथून खासगी विमानाने औरंगाबाद विमानतळावर येतील. तेथून ध्यान फार्मस, शहाजतपूर, ता. खुलताबाद येथे मुक्कामी जातील. 8 फेब्रुवारीला त्या घृष्णेश्वर मंदिर व वेरूळ लेणीला भेट देतील. 9 फेब्रुवारीला त्यांचे प्रस्थान होईल. दरम्यान विमानतळापासून ते शहराच्या हद्दीपर्यंत शहर पोलिसांची सुरक्षा राहिल. ग्रामीण-हद्दीत ग्रामीण पोलिसांची सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. ग्रामीण पोलिस दलातील 100 हून अधिक कर्मचारी व दहा ते पंधरा पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रस्ता, मुक्कामाचे ठिकाण आणि वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर आदी ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे.
हिलरी क्लिंटन यांचे मंगळवारी वेरूळ परिसरात आगमन होणार आहे. त्या येथील एका फार्महाउसमध्ये दोन दिवस मुक्कामी थांबणार असून, बुधवारी दिवसभर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदिरास भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे फार्म हाउस व लेणी परिसरात सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिलरी क्लिंटन यांना झेड प्लस सुरक्षा
दरम्यान वेरूळ परिसरातील सहजतपूर येथील ध्यान फार्म हाउसमध्ये हिलरी क्लिटन यांचे आगमन होणार आहे. त्यानिमित्त या ठिकाणी एक पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, 20 पोलिस कर्मचारी, 5 महिला पोलिस कर्मचारी यांचा सशस्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच लेणी व मंदिर परिसरात जवळपास 150 अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारपासूनच या फार्म हाउस परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्यांची विचारपूस करूनच आत सोडले जात आहे. हिलरी क्लिंटन यांना झेड प्लस सुरक्षा आहे. बंदोबस्ताचे प्रभारी म्हणून कन्नडचे उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव पाहत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! साडेआठ लाखांची लाच घेणाऱ्या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्याला औरंगाबादमध्ये अटक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
