एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: मोठी बातमी! वाल्मिक कराडसह 8 आरोपींविरोधात CID दाखल करणार 1400 पानी चार्जशीट, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता

9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती . आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीतून पुढे ही हत्या झाल्याचे समोर आले

Beed: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आहेत .या प्रकरणात आता मोठी बातमी समोर येत असून  संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज वाल्मिक कराडसह इतर 8 आरोपींच्या विरोधात सीआयडी (CID) 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली .बीडच्या विशेष मकोका कोर्टात आज हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे .या आरोप पत्रात मोठे गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती आहे . (Santosh Deshmukh Case)

9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती . आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीतून पुढे ही हत्या झाल्याचे समोर आले . या हत्येची सुरुवात ज्या खंडणी प्रकरणातून झाली होती ,त्या खंडणी प्रकरणापासून अपहरणाच्या प्रकरणापर्यंत तपास सीआयडीच्या हाती होता. खूनाचा तपास SIT कडे आहे.  त्यामुळे सीआयडी कडून दाखल करण्यात येणाऱ्या 1400 पानी आरोपपत्रात नक्की काय उलगडे होतात हे महत्त्वाचं ठरणार आहे .

काय असेल आरोप पत्रात ?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सीआयडी बीडच्या विशेष मकोका कोर्टात वाल्मीक कराडसह 8 आरोपींच्या विरोधात एक आरोप पत्र दाखल करणार आहे .हे साधारण 1400 पानांचे आरोपपत्र खंडणी प्रकरण आणि अपहरणाच्या प्रकरणात मोठे उलगडे आणि गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे .या आरोप पत्रात वाल्मीक कराड ,विष्णू चाटे ,सुदर्शन घुले ,प्रतीक घुले,जयराम चाटे कृष्णा आंधळे सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे यांच्या विरोधात असलेले पुरावे आणि गुन्ह्यातला सहभाग या संदर्भातले पुरावे आहेत . बीडच्या विशेष मकोका कोर्टात ही चार्जशीट दाखल होणार असून साक्षीदारांचे जबाब ,खंडणी प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण ?आरोपींना फरार होण्यासाठी कोणी मदत केली ?आरोपींना आर्थिक मदत कोणी केली या महत्त्वाच्या प्रश्नांचा उलगडा होण्याची शक्यता आहे .

सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती

संतोष देशमुख हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी) मोठी घोषणा केली. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.. तर ॲड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देशमुख कुटुंबियांनी एकूण सात मागण्या सरकारपुढे ठेवल्या होत्या. त्यातील एक मागणी पूर्ण झाली आहे.

हेही वाचा:

Dattatray Gade: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे राजकारण्यांच्या बॅनर्सवर; माऊली कटके अन् अशोक पवारांसोबत फोटो, नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget