एक्स्प्लोर

Bacchu Kadu : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीसाठी शड्डू ठोकला; राजू शेट्टी, मनोज जरांगेसह एमआयएम सोबतही खलबतं

Amravati News : सरकारकडे आमच्या 18 प्रमुख मागण्या आहेत. त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही, असे मोठे वक्तव्य प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलंय.

Maharashtra Politics अमरावती : सरकारकडे आमच्या 18 प्रमुख मागण्या आहेत. त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही, असे मोठे वक्तव्य प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलंय. सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर ठीक, अन्यथा आम्ही शेतकरी, शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू.असा इशाराही  त्यांनी दिलाय. आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी (Raju Shetty), मनोज जरांगे (Manoj Jarange Patil),  एमआयएम (MIM) सोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावरच एकत्र बसू.  अन्यथा आम्ही बसणार नाही. तर वेळ आली तर एकटे लढू. मात्र मुद्द्यांवर ज्या ज्या पक्षाचं एक मत होईल त्यांच्यासोबत आम्ही लढणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. ते अमरावती येथे बोलत होते. 

आम्ही किमान 20 ते 25 जागांवर लढू- बच्चू कडू

आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे. सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू. आम्ही किमान 20 ते 25 जागांवर लढू आणि जिथे जिथे चांगले उमेदवार मिळत आहेत तिथे आम्ही पुढे जाऊ. आमचा मूळ मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा. त्या मुद्द्यावर जर सर्व एकत्र आले तर आम्ही नक्कीच सोबत राहू, अन्यथा नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. 

भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू - बच्चू कडू 

सध्याघडीला देशात मोठा प्रश्न आर्थिक विषमतेचा आहे. काम करणार्‍याला कमी पैसे आणि एजन्टला जास्त पैसे मिळतात. काम न करणार्‍यासाठी शासन आहे का, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तर दुसरीकडे शासन लेक लाडकी योजना जाहीर करते आहे. कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. पैसे नसतील तर त्यांना सल्ला आहे. तर दुसरीकडे गर्व्हनरचा बंगला चाळीस एकर वर आहे. अशा परिस्थितीत तो विका त्याचे एक लाखभर कोटी येतील, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. ज्या पारशी लोकांनी अत्याचार केले. त्यांच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी मुंबईत आहे. कष्ट करणार्‍याचे मूल्य जपले पाहिजे. दिव्यांग, कष्टकरी यांचा बजेटमध्ये किती वाटा आहे, हे आम्ही विचारतोय. श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याचे मार्ग आम्ही तोडतोय. तर येत्या 9 ऑगस्टला संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर  मग अंतिम निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget