एक्स्प्लोर

INDIA Alliance : संवाद संपला आता 'सामना' सुरू? इंडिया आघाडीतील विसंवादाचा शेवट काय होणार? 

INDIA Alliance : मित्रपक्षांसोबत संवाद ठेवा असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. तर राऊतांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाला सल्ला द्यावा असं प्रत्युत्तर खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलं. 

मुंबई : लोकसभेनंतर इंडिया आघाडीतील बिघाडी सातत्याने समोर येत आहे. आता दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसंतय. त्याबद्दलची काळजी ठाकरेंच्या सामनाने अग्रलेखात व्यक्त केली. संवादाच्या नावाने इंडिया आघाडीत ठणाणा असल्याची टीका सामनाने केली आहे. काँग्रेसने मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेस याला प्रतिसाद देईल का? इंडिया आघाडीचं अस्तित्व किती दिवस टिकेल? हे पाहावं लागेल. 

ठाकरेंच्या सामनातून राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला हात जोडून विनंती करण्यात आली आहे. इंडिया आघाडी एकत्रित ठेवण्यासाठी पुढाकार घ्या अशी ती विनंती आहे. प्रादेशिक पक्षांना अस्तित्व टिकवायचे आहे हे समजून घ्या अशी ती विनंती आहे. आपल्या घटलेल्या शक्तीची जाणीव ठेवा अशी ती विनंती आहे.मित्रपक्षांसोबत 'संवाद ठेवा' अशी ती विनंती आहे. या सगळ्याला कारण ठरलं दिल्लीत काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्षात सुरु असलेली राजकीय लढाई.

काही सहकाऱ्यांकडून संवाद तुटला

गेल्या काही दिवसांपासून काही सहकाऱ्यांकडून संवाद तुटला आहे. इंडिया आघाडीने लोकसभेत चमकदार कामगिरी केली म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे. मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ही जबाबदारी असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. 

राऊतांनी त्यांच्या पक्षाला सल्ला द्यावा, वर्षा गायकवाडांचे प्रत्युत्तर

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीत आहेत. पण दिल्ली विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर सत्ताधारी आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यात काँग्रेसने प्रचारात केजरीवालांना देशद्रोही म्हणण्यावर सामनाने आक्षेप घेतला आहे. यावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.

सामनाच्या अग्रलेखा बद्दल त्यांना विचारा. केंद्रातील राजकारण वेगळं असते, राज्यातील राजकारण वेगळ असते. संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली. तो सल्ला त्यांनी त्यांच्या पक्षाला द्यावा असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. 

राऊतांकडून एनडीएचा दाखला

सामनातील अग्रलेखात एनडीएच्या काळातील आठवणींवर सुद्धा भर देण्यात आला आहे. इंडिया आघाडीने एनडीएच्या नियोजनातून शिकायला हवं असा सल्ला सुद्धा दिला आहे. इंडिया आघाडीला तातडीने एक नेतृत्व आणि एक निमंत्रक हवा अशी भूमिका सामनाने मांडली आहे. भाजपला मात्र इंडिया आघाडी एक राहणार नाही याची खात्री आहे.

एकेकाळी कट्टर काँग्रेस विरोधी असलेल्या ठाकरेंच्या सामना वृत्तपत्रात काँग्रेस वाचवण्यासाठी हिताचा सल्ला दिला जात आहे. त्याचवेळी विसंवादाचं मुख्य खापर काँग्रेसवर फोडण्यात आल्याचंही दिसतंय. सामनातील सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल का? मित्रपक्षांना एकत्र ठेवण्यासाठी कष्ट घेईल का? इंडिया आघाडीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या भावाची भूमिका बजावेल का?अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या काही दिवसात आपल्याला मिळतील.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget