एक्स्प्लोर

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील बेलतरोडी, घोगली ग्रामपंचायत बरखास्त ; बेसा-पिपळा नवीन नगरपंचायत घोषित; कोणत्या भागांचा समावेश, जाणून घ्या...

नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना निघाल्याने 2 ग्रामपंचायती बरखास्त झाल्या. त्यामुळे येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. भारत नंदनवार यांची प्रशासन म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

Nagpur News : बेसा-बेलतरोडी आणि पिपळ-घोघली या दोन ग्रामंचायतींची मिळून एक नगरपंचायत करण्यात आली आहे. 'बेसा-पिपळा' या नावाने ही नगरपंचायत असणार आहे. याबाबतची अंतिम अधिसूचना शुक्रवारी (20 जानेवारी) जारी करण्यात आली. त्यामुळे विद्यमान ग्रामपंचायत बरखास्त झाली. दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायत करण्याची मागणी होती. त्याबाबतचा प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला होता. राज्य शासनाने याला मंजुरी दिली. सप्टेंबर महिन्यातच यावर सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले होते. शुक्रवारी याला अंतिम रुप देण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेचे क्षेत्र कमी झाले आहे. परंतु एकही जिल्हा परिषद सर्कल कमी होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या सदस्यत्वावर परिणाम होणार नाही. दोन्ही ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते.

प्रशासकाची नियुक्ती

नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना निघाल्याने दोन्ही ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. वानाडोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांची प्रशासक म्हणून नियुक्त केली आहे. येथील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक चांगलीच चर्चेत होती.

सरकारकडून आचारसंहितेचा भंग? 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभागात आचारसंहिता लागू करण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत आचारसंहिता असून तिचा भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिला होता. या दोन्ही ग्रामपंचायती एनएमआरडीच्या (Nagpur Metro Region Development Authority) कक्षेत येत होत्या. परंतु आता दोन्ही ग्रामपंचायती मिळून नगरपंचायत झाल्याने त्या एनएमआरडीएच्या (NMRDA) कक्षेतून बाहेर निघाल्याचे सांगण्यात येते.

बहादुरा प्रतीक्षेतच

बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोगलीसह बहादुरा-खरबी-गोन्ही सिम मिळून एक नगरपंचायत करण्याची अधिसूचना 13 सप्टेंबरला अधिसूचना जारी करण्यात आली होती. यावर 30 दिवसांच्या आता सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले होते. यावर सुनावणीही झाली. परंतु फक्त बेसा-पिपळा नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना करण्यात आली. बहादुरा नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बहादुरा नगरपंचायतीसाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या क्षेत्राचा असणार समावेश

  • मौजा बेसा सर्व्हे नं. 1 ते 96
  • मौजा बेलतरोडी सर्व्हे नं. 1 ते 142
  • मौजा पिपळा सर्व्हे नं. 1 ते 221
  • मौजा घोघली सर्व्हे नं. 1 ते 41

ही बातमी देखील वाचा...

शिक्षक, पदवीधर मतदारांनो ही काळजी घ्या, अन्यथा तुमचे मतदान ठरेल अवैध, जाणून घ्या सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget