Gautami Patil: गौतमीच्या तीन गाण्याला तीन लाख,आम्ही पाच हजार मागितले तर पैशांचा बाजार; इंदुरीकरांनी घेतला समाचार
इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचा चांगलाच समाचार घेतला आहे. गौतमी पाटीलचं उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी टीका केली आहे.

बीड: नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या राज्यभरात चर्चेत आहे. गौतमी पाटीलचा अनेकांनी विरोध देखील केला. आता यात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची भर पडली आहे. इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचा चांगलाच समाचार घेतला आहे. गौतमी पाटीलचं उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी टीका केली आहे. गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलं आहे. आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे आज इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नाही. असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटले आहे.
गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात
महाराष्ट्राला (Maharashtra) वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटला की आजही प्रचंड गर्दीचा माहोल असतो. यात तिच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे. तरुणांना तर गौतमी पाटीलच भलतंच वेड असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा हे जणू समीकरण बनले आहे. त्य ठिकठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी आणि राड्याचा अनुभव पाहता सुरुवातीला गौतमी येण्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीयता पाळण्यात येते. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांतून तिला नृत्याच्यासाठी बोलवलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे गौतमीने लावणीला बदनाम केल्याचा आरोप ज्येष्ठ लावणी कलावंतांनी केला आहे.
गौतमी पाटील कोण आहे?
गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. इतकंच काय तर अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं जातं आणि त्यासाठी तिला मानधन दिलं जातं. दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हिडीओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली. सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या, ज्यामुळे गौतमीला माफी मागावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
