Maharashtra Corona Update : राज्यात आज 536 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 853 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 536 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 853 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 82 हजार 493 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के आहे.
राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7854 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 85 हजार 800 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1028 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 54 , 20, 117 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 115 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 115 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 269 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,41,769 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
देशात 24 तासांत आढळले 8,309 नवे रुग्ण
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रोन व्हेरिएंटनं जगभरात खळबळ माजवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ओळखून देशांमध्ये सतर्कतेचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त करत उपाययोजनाची चचपणी करण्याचा आदेश दिलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 8 हजार 309 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 9 हजार 905 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 122 कोटी 41 लाख डोस देण्यात आले आहेत.देशाचा रोगमुक्ती दर सध्या 98.34% आहे; मार्च 2020 पासूनचा सर्वात उच्चांकी दर
गेल्या 24 तासात 9,905 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण कोरोनामुक्तांची संख्या वाढून 3,40,08,183 झाली आहे.
Omicron Variant : ओमिक्रॉन व्हेरियंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
