(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Variant Guidelines : ओमिक्रॉननं धाकधुक वाढवली, केंद्र सरकारकडून सुधारीत गाईडलाईन्स जारी
Corona New Variant : लसीकरण झालं असलं तरी संसर्गाचा धोका असणाऱ्या देशांतून भारतात येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करणं अनिवार्य असणार आहे.
Omicron Variant Guidelines : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं जगाची धाकधूक वाढवली आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण अनेक देशांमध्ये आढळल्यानंतर प्रत्येक देशांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे. अनेक देशांनी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. केंद्र सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे.
संसर्गाचा धोका असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारतात येण्यासाठी प्रवास सुरु करण्यापूर्वी 72 तास आधी कोरोना चाचणी करणं अनिर्वाय असणार आहे. तसेच भारतात विमानतळावर दाखल झाल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना क्वॉरंटाइन केलं जाणार आहे. तसेच त्यांच्यावर क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.
याशिवाय, त्यांचे नमुने संपूर्ण जीनोम सिक्वेंसिंगसाठी दिले जातील. विमानतळावर कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. त्यानंतर भारतात आल्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येईल. त्यानंतर 7 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावं लागणार आहे.
ओमिक्रॉनचा धोका, मुंबईत अलर्ट; व्हायरसला रोखण्यासाठी महापालिका सज्ज
कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग मुंबईत फैलावू नये, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार काही नियम तयार करण्यात आल्या असून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
विमान प्रवासासाठी तिकिट बुक करताना विमान कंपन्याना हमी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घ्यावी अशी प्रशासनाने सूचना केली आहे. मागील 15 दिवसांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. विलगीकरणासाठी 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार हॉटेल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थात्मक विलगीकरणाच्या कालावधीनंतरही 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेचे रिचर्डसन अॅन्ड क्रुडास कोविड सेंटर हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता राखीव असणार आहे.