आमच्या हॉटेलमध्ये बीफ तयार केलं जात नाही, लाहोरी बारच्या मालकाने स्वतःहून पोलीस स्टेशन गाठले, सुषमा अंधारेंचे आरोपही फेटाळले
नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातानंतर चर्चेत आलेल्या लाहोरी रेस्टॉरंट बारचे मालक समीर शर्मा हे स्वतःहून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. यावेळी त्यांनी जय राऊत विरोधात तक्रार दाखल केली आहे.
![आमच्या हॉटेलमध्ये बीफ तयार केलं जात नाही, लाहोरी बारच्या मालकाने स्वतःहून पोलीस स्टेशन गाठले, सुषमा अंधारेंचे आरोपही फेटाळले Lahori Bar Owner Reaches Police Station and Denie Sushma Andhare s Allegations over nagpur audi car hit and run case uapdate news nagpur आमच्या हॉटेलमध्ये बीफ तयार केलं जात नाही, लाहोरी बारच्या मालकाने स्वतःहून पोलीस स्टेशन गाठले, सुषमा अंधारेंचे आरोपही फेटाळले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/11/7b2560e5e2e1f346366c6d87515f4c151726061305822892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur Accident नागपूर: नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातानंतर (Nagpur Audi Car Hit and Run Case) चर्चेत आलेल्या लाहोरी रेस्टॉरंट आणि बारचे मालक समीर शर्मा हे स्वतःहून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. आज सकाळी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बार मध्ये संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी बीफ कटलेट खाल्ल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर समीर शर्मा स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. सोबतच संजय राऊत यांचा आरोप खोटा आहे, असे पोलिसांना सांगून ते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागल्याचे बघायला मिळत आहे.
हॉटेलमध्ये बीफ आणि त्याचा कुठलाही पदार्थ तयार केला जात नाही
आमच्या हॉटेलमध्ये बीफ आणि त्याचा कुठलाही पदार्थ तयार केला जात नाही. त्यामुळे ज्याने कोणी ऑडी कारच्या अपघाताशी संबंधित तरुणांनी आमचे हॉटेलमध्ये बीफ खाल्ल्याचा आरोप केला आहे, ते खोटं बोलत आहेत. पोलिसांनी त्यांना शोधावं आणि त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारचे मालक समीर शर्मा यांनी केली आहे.
समीर शर्मा यांनी आज अचानक सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून हॉटेलमध्ये बीफ दिले जाते आणि संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी बीफ कटलेट खाल्ले, असा आरोप करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपल्या तक्रारीच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी लाहोरी रेस्टॉरंट मध्ये बीफ खाल्ल्याचा आरोप केला होता. त्यापाठोपाठ सुषमा अंधारेंनी देखील हे आरोप केले होते.
खाण्याच्या वस्तूचे ऑर्डर दिलेच नाही,बीफचा प्रश्न आलाच कुठून?
घटनेच्या रात्री चार तरुण आमच्या रेस्टॉरंट मध्ये आले होते. त्यांनी खाण्याची कुठलीही वस्तू मागितली नाही. त्यांनी दारू आणि कोल्ड्रिंक मागितली. ती त्यांना देण्यात आली आणि 15 मिनिट थांबून ते तरुण तिथून निघून गेले. त्यांनी कुठलेही खाण्याच्या वस्तूचे ऑर्डर दिलेच नाही, त्यामुळे बीफ कटलेटचा प्रश्न आलाच कुठून, असा सवाल समीर शर्मांनी विचारला आहे.
खोटा आरोप करणाऱ्यांच्या विरोधात मी कोर्टात जाईल
असे खोटे आरोप आमच्या अनेक दशकांच्या व्यवसायाला धक्का पोहोचवणारे आहे.. त्यामुळे पोलिसांनी असे आरोप करणाऱ्यांना शोधावं आणि त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी समीर शर्मा यांनी केली आहे.. पोलिसांनी कारवाई केली नाही तर असा खोटा आरोप करणाऱ्यांच्या विरोधात मी कोर्टात जाईल असा इशाराही समीर शर्मा यांनी दिला आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरच्या रामदासपेठेतील अपघातात ज्या ऑडी कारने हा अपघात केला त्या कारची आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन केले आहे. आरटीओ अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेल्या अपघात घडवणाऱ्या ऑडी कारचे इन्स्पेक्शन केले आहे. अपघातावेळी ऑडी कार अत्यंत तीव्र गतीमध्ये होती, असा आरोप महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी लावला होता. त्या अनुषंगाने ही आरटीओ अधिकाऱ्यांनी ऑडी कार ची तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे.
लाहोरी बार मध्ये जे बिल आहे ते लोकांसमोर आले पाहिजे. त्या बिलामध्ये दारूचा उल्लेख आहे. सोबतच त्यात चिकन, मटण आणि बीफ कटलेटचा अर्थात गोमांस याचा देखील त्यात समावेश आहे आणि हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)