एक्स्प्लोर

Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या, दोघांची प्रकृती गंभीर; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Nagpur Hit and Run : जर कोणी दुसऱ्या पक्षाचा नेता असता तर फडणवीसांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या, असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदासपेठेत एकामागून एक दुचाकीसह चार ते पाच वाहनांना धडक दिली. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये नव्हता, माहिती मिळत आहे. आता या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chadrashekhar Bawankule) मुलाने सहा गाड्या उडवल्या. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, तो कोणत्या पार्टीचा आहे याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा असो किंवा कुठल्याही नेत्याचा असो या राज्यात दोन कायदे आहेत का? महाराष्ट्रात हिट अँड रनच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. हे मोठ्या बापाचे मुलं नशेत धुंद होऊन कोणालाही रस्त्यात उडवतात. या मोठ्या बापाच्या मुलांचे एफआयआरमध्ये नावही येत नाही. या राज्यात जर कायदा एक आहे तर फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी नागपूरमधील हिट अँड रन केस बाबत बोलायला हवे. 

...तर ही चोरीचपाटी का केली? 

नागपूरमधील अपघाताची गाडी कोणाची होती? ती गाडी कोणाच्या नावावर होती? गाडी कोण चालवत होतं? त्यानंतर चालकाची अदलाबदली करण्यात आली हे रेकॉर्डवर आहे. आरटीओ ऑफिसरने काय केले? नंबरप्लेट का बदलण्यात आली. जर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या अपघाताशी संबंध नाही तर ही चोरीचपाटी का करण्यात आली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

...तर फडणवीसांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या

ते पुढे म्हणाले की, जर कोणी दुसऱ्या पक्षाचा नेता असता तर फडणवीसांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या. मात्र आज तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आहे. तो नशेत धुंद होता. दोन लोक गंभीर जखमी झालेत आणि एफआयआरमध्ये मुलाचे नाव देखील नाही. सर्व पुरावे मिटवण्यात आले आहेत हे अधिकार तुम्हाला आहेत का? देवेंद्र फडणवीस तुम्ही या पदावर बसण्याच्या लायक नाही. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत तोपर्यंत कुठल्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. कायदा फडणवीसांच्या कोठीवर नाचत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. 

संजय राऊतांचा आरोप

गाडीने सहा गाड्यांना ठोकर मारली. चार लोक जखमी आहेत. दोन लोक अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहेत. ते जीवन मधमाशी झुंज देत आहेत. लाहोरी बार मधून नशेत धुंद होऊन हे लोक गाडीत बसले आणि गाडी चालवत गेले. गाड्या ठोकल्या, सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहेत. त्यानंतर गाडीची नंबर प्लेट काढून करून टाकली. युवराज स्वतः गाडी चालवत होते. पण, अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

आणखी वाचा 

ऑडी कारच्या 'त्या' अपघातातील गाडी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचीच; सुषमा अंधारे यांचा आरोप, बावनकुळेचीही कबुली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jio Server Down : गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोपLalbaugacha Raja Visarjan : लालबागच्या राजाचं मंडपातून प्रस्थान, लाखो भक्तांची मांदीयाळीLalbaugcha Raja Visarjan 2024 :लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तुफान गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्तLalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Server Down : गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Delhi Chief Minister दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
Sherlyn Chopra Shocking Confession :   होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
Embed widget