एक्स्प्लोर

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का, एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरव पाटील यांची हकालपट्टी

पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरुन हटववण्यात आलेय. एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील (saurav patil) हे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

मुंबई : एसटी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी (commissioner for cooperation and registrar cooperative societies maharashtra) जोरदार दणका दिलाय. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरुन हटववण्यात आलेय. एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील (saurav patil) हे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे जवळचे नातेवाईक आहेत. आरबीआयची पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकार खात्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता थेट कारवाई करण्यात आली आहे. 

एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांच्याकडून पात्रता निकषाची पुर्तता होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.  एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना किमान आठ वर्षांचा अनुभव हवा असतो. त्याशिवाय 35 वर्ष वयाची अट आहे. पण सौरभ पाटील यांचं वय 25 वर्षांच्या आसपास आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे आठ वर्षांचा अनुभवही नाही. त्याशिवाय आरबीआयची परवानगी घेणेही बंघनकारक असते. पण सौरभ पाटील कोणत्याच निकषात बसत नव्हते. त्यामुळे अखेर सहकार आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, एसटी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून सौरभ पाटील हे कोणत्याही निकषात बसत नव्हते, त्यामुळे सहकार आयुक्तांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मागील तीन ते चार महिन्यात याप्रकरणाबाबत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. 

मागील तीन ते चार महिन्यात एसटी बँकसंदर्भात मोठ्या घडमोडी घडल्या आहेत. बँकेतील ठेवीही काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अंदाजे 480 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेतून काढल्याचे समोर आलेय.  त्यानंतर एसटी बँकेच्या संचलाक मंडळानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता सहकार खाते सक्रीय झाले असून त्यांनी सौरभ पाटील यांच्यावर मोठी कारवाई केली. एसटी बँकेतील 480 कोटींच्या ठेवी काढल्याचं समोर आल्यानंतर याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. आता सहकार आयुक्तांनी एसटी बँकेला पत्र लिहून सौरभ पाटील यांना आठवडाभरात काढून टाकण्याचे निर्देश दिलेत. त्याशिवाय याच कालावधीत नव्या संचालकांची नेमणूक करा, असेही आदेश देण्यात आले आहेत.  त्याशिवाय इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असेही पत्रात म्हटलेय. 

सौरभ पाटील यांच्यावर कारवाईचा बडगा उघारण्यात आलाय. हा गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. गुणरत्त सदावर्ते यांच्या पॅनेलटी एसटी बँकेवर सत्ता आहेत. त्यांचे नातावेईक सौरभ पाटील हे संचालक झाले होते. पण ते कोणत्याही निकषात बसत नव्हते. याआधी सहकार आयुक्तांनी पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता सौरभ पाटील यांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 02 October 2024 : ABP MajhaBadlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटकZero Hour Sai Baba Ideol : धर्माच कारण देत साईंना लक्ष करणं थांबायला हवं का?Zero Hour MVA Mumbai Seat Sharing :मविआत 'मुंबई का किंग' कोण बनणार?वांद्रे पूर्वमध्ये सांगली पॅटर्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
Embed widget