Fertilizer : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, रब्बी हंगामाची पेरणीच्या तोंडावर खतांच्या किंमतीत वाढ
रब्बी हंगामाच्या पेरणीची सुरुवात होत असताना त्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीत मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता महागाईचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई : एकीकडे अवकाळी पाऊस, त्यामुळे उद्धस्त झालेला शेतकरी अशी काहीशी परिस्थिती असताना आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. रब्बी हंगामाची पेरणी तोंडावर असताना आता त्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीत मात्र मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
रब्बी हंगामाची पेरणी चालू असतानाच खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मात्र जास्तीचे पैसे देऊन खत विकत घ्यावे लागत आहे. युरियाचा भाव आणि डीएपी खताचे भाव जरी वाढला नसला तरी रब्बी हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमती मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे.
नेमक्या कोणत्या खतांच्या किमती किती रुपयांनी वाढल्या आहेत ते पाहूयात.
खताचे नाव आधीचा दर नवीन किंमत
- डीएपी 1200 1200
- युरिया 266 266
- 10.26.26 1300 1470
- 12.32.16 1300 1470
- 20.20.0.13 1150 1250
- 15.15.15 1250 1400
खताला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातीव किंमती वाढल्या असल्याचं सांगितलं जातं. त्याचा थेट परिणाम भारतातील खताच्या किंमतीवर झाल्याचंही काही तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं. कोरोनाच्या काळात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पण लॉकडाऊनमध्ये शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगलीच खालावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर केंद्राने ही किंमत वाढ काही अंशी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
संबंधित बातम्या :
- कोरोना संकटात रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या, दर कमी करण्यासाठी राज्याच्या कृषीमंत्र्यांचे केंद्र सरकारला पत्र
- शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका; खतांच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
- DAP Fertilizer Rate : शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी मिळणार खतं, प्रचंड विरोधानंतर केंद्र सरकारनं घेतला निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
