एक्स्प्लोर

Video : संचारबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी वधु- वरांस अटक; जिल्हाधिकाऱ्यांनी विवाहसोहळ्यात थेट एंट्री घेत केली कारवाई

कोरोना काळात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अतोनात प्रयत्न करत हा संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांत असताना नागरिकांचा बेजबाबदारपणा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.

अगरतळा :  कोरोना काळात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अतोनात प्रयत्न करत हा संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांत असताना नागरिकांचा बेजबाबदारपणा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. सरतेशेवटी प्रशासनालाच काही कठोर पावलं उचलावी लागत आहेत. सध्या असंच चित्र पाहायला मिळालं आहे त्रिपुरामध्ये. 

त्रिपुरा पश्चिमचे जिल्हाधिकारी डॉ. शैलेश कुमार यादव यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह रात्रीच्या संचारबंदीचे नियम लागू असतानाही विवाहसोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या दोन ठिकाणांवर धाड टाकली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाच वारंवार ताकिद देऊनही नियमांची पायमल्ली होण्याचं सत्र सुरुच असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला. 

Corona Vaccine Registration : 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; कशी कराल नोंदणी?

सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी ही कारवाई करण्यात आली. ज्यावेळी यादव यांनी विवाहस्थळांना भेट देत भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 144 मधील नियमांची पायमल्ली होत असल्याचं कारण पुढे करत ही कारवाई केली. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार धाड टाकण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणांपैकी एका ठिकाणहून 31 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 19 महिलांचाही समावेश आहे. सदर समारंभांची माहिती मिळताच संचारबंदीच्या नियमांचं पालन होत नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत यादव यांनी या कार्यक्रमांवर धाड टाकली ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला, पुरुष आणि लहान मुलं एकत्र आली होती. 

सोशल मीडियावर सध्या या कारवाईचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जिल्हाधिकारी वराला आणि ब्राह्मणाला पोलिसांना ताब्यात घेण्याचे आदेश देताना दिसत आहेत. 'ही सर्व मंडळी उच्चशिक्षित आहेत. तरीपण ते नियमांचं पालन करत नाहीत. ही तीच माणसं आहेत जी दुसऱ्या बाजूला सरकार काहीच करत नाही म्हणून आरोप करत असतात. सदर प्रकरणाची कल्पना असूनही कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत', असं यादव घटनास्थळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत  होईल- सुरेश धसJitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Embed widget