एक्स्प्लोर

Corona Vaccine Registration : 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; कशी कराल नोंदणी?

18 ते 44 वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असणार आहे. सरकारनं स्पष्ट केलं आहे की, या लोकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही.

मुंबई : देशभरात एक मेपासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. या शनिवारपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करता येणार आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. 18 ते 44 वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असणार आहे. सरकारनं स्पष्ट केलं आहे की, या लोकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. दरम्यान, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपचा वापर करु शकता. लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिर्वाय असेल. 

लसीकरणाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं कराल? 

  • कोरोना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन करु शकतात.
  • www.cowin.gov.in या वेबसाईटवर लॉगइन करा.
  • Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा.
  • Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
  • जो मोबाईल क्रमांक रजिस्टर कराल त्या नंबरवर OTP येईल. तिथे टाका आणि Verify वर क्लिक करा.
  • Vaccine Registraction form दिसेल त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरा आणि Submit वर क्लिक करा.
  • तुम्ही vaccine साठी registraction केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.
  • त्यानंतर schedule appointment वर क्लिक करा. आणि त्यामध्ये तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पिन कोड टाका.
  • लसीकरणासाठी Session निवडा,  सकाळचे किंवा दुपारचे.
  • Vaccin center आणि  Date निवडा.
  • Appointment book करुन ती confirm करा.
  • Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
  • त्यामुळे vaccination center वर  vaccine देणं सोपं होईल आणि गर्दीही होणार नाही. 
  • याच पद्धतीनं तुम्ही आरोग्य सेतू अॅपवरही रजिस्ट्रेशन करु शकता. 

देशातील आतापर्यंतच्या लसीकरणाची आकडेवारी 

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली होती. त्यानंतरपासून आतापर्यंत एकूण 14.77 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, मंगळवारी 24 लाखांहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत एकूण 14 कोटी 77 लाख 27 हजार 54 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 

महाराष्ट्राने ओलांडला मोठा टप्पा; दीड कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज 8 लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे 12 कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणीत कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयांनी नंदूरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Akola News : शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Solanke on Beed Case| बीडमध्ये पैशाचा वापर करून गुंडगिरी, प्रकाश सोळंकेंचा जोरदार हल्लाबोलPrakash Mahajan on Beed|बीडमध्ये शस्त्राचे प्रदर्शन, स्वत:ची बंदूक पोलिसांकडे जमा करणार-प्रकाश महाजनSuresh Dhas On Beed Case | कोण अमोल मिटकरी, आगीत तेल ओतण्याचं काम करू नको, सुरेश धस यांची टीकाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 27 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Akola News : शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
IPO Update : ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल आता सर्वांच्या नजरा Unimech Aerospace IPO कडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओकडे सर्वांचं लक्ष, IPO तब्बल 174.93 पट सबस्क्राइब,GMP कितीवर पोहोचला?
Prajakta Mali: सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
Embed widget