Tomato Flu Study : टोमॅटो फ्लूला रोखलं नाही तर प्रौढांमध्ये संक्रमण होईल, लँसेट जर्नलचा इशारा
Tomato Flu Study : कोरोना (Covid-19) आणि मंकीपॉक्सनंतर (Monkeypox) आता भारतात टोमॅटो फ्लूचा उद्रेक वाढताना दिसत आहे.

Tomato Flu Study : कोरोना (Covid-19) आणि मंकीपॉक्सनंतर (Monkeypox) आता भारतात टोमॅटो फ्लूचा उद्रेक वाढताना दिसत आहे. टोमॅटो फ्लू (Tomato Flu) हा संसर्ग पाच वर्षांखालील मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे. देशात आतापर्यंत या फ्लूची लागण झालेल्या बालकांमध्ये 0 ते 9 वर्ष वयोगटातील बालकांचा समावेश असला तरी या फ्लूमध्ये मुलांमध्ये खूप ताप, जुलाब, सांधेदुखी अशी विविध लक्षणे दिसतात. केंद्र सरकारकडून याबाबत राज्यांना नियमांवलीही जारी करण्यात आली आहे. आता यावर द लँसेट रेस्पिरेटरी जर्नलनं आपला रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. यामध्ये टोमॅटो फ्लूबाबात सावध केलेय.
द लँसेट रेस्पिरेटरी जर्नलने आपल्या रिपोर्टमध्ये असा दावा केलाय की, टोमॅटो फ्लूवर (Tomato Flu) नियंत्रण मिळवावे लागेल. अन्यथा लहान मुलांना होणाऱ्या या आजाराचे संक्रमण प्रौढांमध्येही होईल. त्यामुळे वेळीच उपाय शोधावा लागेल, अन् काळजी घ्यावी लागेल. लँसेटच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत भारतामध्ये केरळ (Kerala) आणि ओडिशामध्ये (Odisha) या आजाराची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. आतापर्यंत 82 मुलांना याची लागण झाली आहे. ही मुले 5 वर्षाखालील आहेत. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 6 मे रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात या फ्लूने ग्रस्त मुलाची पहिली केस नोंदवली गेली आणि 26 जुलैपर्यंत टोमॅटो फ्लूने ग्रस्त मुलांची संख्या 82 वर पोहोचली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सरकारी रुग्णालयाकडून या फ्लूची लागण झालेल्या 26 बालकांची माहिती देण्यात आली. या मुलांचे वय 1 ते 9 वर्षे दरम्यान आहे. मात्र, एकूण बाधित मुलांमध्ये 1 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.
केंद्र सरकारकडून राज्यांना नियमावली -
केंद्र सरकारकडून आज टोमॅटो फ्लू बाबत देशातील सर्व राज्यांना एडव्हायजरी पाठवण्यात आलीय. यातील निर्देशांनुसार लहान मुलांना टोमॅटो फ्लू होण्यापासून वाचवता येईल असं केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटलंय. खालील काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजेत:
● संक्रमित व्यक्तीशी त्वरित संपर्क टाळा.
● तुमच्या मुलाला चिन्हे आणि लक्षणे आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल शिक्षित करा.
● तुमच्या मुलाला सांगा की ताप किंवा पुरळाची लक्षणे असलेल्या मुलांना मिठी मारू नका किंवा त्यांना स्पर्श करू नका.
● तुम्ही तुमच्या मुलांना स्वच्छता राखण्यासाठी आणि अंगठा किंवा बोट चोखण्याच्या सवयींबद्दल प्रोत्साहित केले पाहिजे.
● रोगाचा प्रसार टाळण्यासाठी मुलाला नाक वाहताना किंवा खोकल्याच्या बाबतीत रुमाल वापरण्यास प्रोत्साहित करा.
● फोड स्क्रॅच करू नका किंवा घासू नका आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही या फोडाला स्पर्श कराल तेव्हा धुवा.
● तुमच्या मुलाला भरपूर पाणी, दूध किंवा ज्यूस पिण्यास प्रवृत्त करून हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा, जे त्यांना आवडते ते तुमच्या मुलामध्ये टोमॅटो तापाची लक्षणे आढळल्यास, रोगाची प्रगती रोखण्यासाठी त्यांना ताबडतोब इतर मुलांपासून वेगळे करा.
● सर्व भांडी, कपडे आणि इतर उपयुक्तता वस्तू (उदा. बिछान्यासाठी) नियमितपणे विभक्त आणि स्वच्छ केल्या पाहिजेत.
● त्वचा स्वच्छ करण्यासाठी किंवा मुलाच्या आंघोळीसाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा.
● रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोषणयुक्त, संतुलित आहार घ्या.
● बरे होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुरेशी विश्रांती आणि झोप घेणे आवश्यक आहे.
● अद्यापपर्यंत, उपचारासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही अँटीव्हायरल औषधे किंवा लस उपलब्ध नाहीत.
टोमॅटो फ्लूची लक्षणे काय आहेत?
उच्च ताप
पुरळ
सांधे दुखी
जंतुसंसर्ग
थकवा
मळमळ
उलट्या
अतिसार
निर्जलीकरण
सांधे सुजणे
संपूर्ण शरीर वेदना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
