एक्स्प्लोर

कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 

Bhima Krushi Pradarshan Aamdar Buffalo : आमदार नावाच्या रेड्याची निगा राखण्यासाठी दोन कामगार असून या महाकाय रेड्याचा महिन्याचा खुराक हा एक लाखाचा आहे

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात '50 खोके एकदम ओके' वाक्यानं जनसामान्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता कोल्हापुरात अवतरलेला 25 खोक्यांचा 'आमदार' पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात तुडुंब गर्दी झाली आहे. हा आमदार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून महाकाय रेडा आहे.

पानिपतवरून थेट कोल्हापुरात अवतरलेला हा आमदार म्हणजे जगातील सर्वात मोठा रेडा होय. त्याचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण खरोखरच त्याचं नाव आमदार आहे. या  'आमदार'चं वय अवघं 4 वर्षे. वजन तब्बल दीड टन, उंची 6 फूट, लांबी 14 फूट आणि किंमत तब्बल 25 कोटी. देशात कुठेही फिरण्यासाठी एसी वाहनाची खास सोय. मुऱ्हा जातीच्या या रेड्याला महिन्याकाठी एक लाखांचा नुसता खुराकचं लागतो. भर-भक्कम शरीरयष्टी, देखणं रूप आणि 25 कोटी किंमत यामुळे हे जनावर नेमकं आहे तरी कसं हे पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची अक्षरशः रीघ लागली आहे.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दरवर्षी भीमा कृषी प्रदर्शनाचा आयोजन करण्यात येतं. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विकसित झालेली बी-बियाणे तसेच पाळीव पशुपक्षी हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असतात. यंदा या कृषी प्रदर्शनात हरियाणातील पानिपतमधून नरेंद्र सिंह यांचा आमदार रेडा प्रमुख आकर्षण ठरत आहे. या रेड्याच्या देखरेखीसाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार रेड्याचा दिवसभराचा खुराक कसा असतो?

- आमदार रेड्याच्या शारीरिक मसाजसाठी एक जण तर चारा आणि देखभालीसाठी एक जण.
- आमदाराला दिवसाला 20 लिटर दूध, 20 किलोफिड आणि 30 किलोंचा चारा आणि भुसा या रेड्याचं दिवसभराचं अन्न आहे. 
- दिवसभरातून तीन वेळा रेड्याला आंघोळ घातली जाते.
- वातानुकूलित कक्षातच रेड्याची देखरेख दररोज राखली जाते. 

नरेंद्र सिंग यांच्याकडे आमदार आहे म्हटल्यानंतर मंत्री देखील असणारच. आमदार नावाच्या रेड्याच्या लहान भावाचं नाव त्यांनी मंत्री असं ठेवलं आहे.

खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रीने देखील या रेड्याची पाहणी केली. हा किती वर्षा वर्षाचा आहे, त्याचे दात किती आहेत, त्याचा खुराक काय असतो ही सगळी माहिती त्यांनी घेतली. 

जगातील सर्वात महागडा आणि महाकाय रेडा म्हणून या रेड्याची ओळख आहे. सात वेळा तो वर्ल्ड चॅम्पियन झाला आहे. त्यामुळे या रेड्याला पाहण्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी या कृषी प्रदर्शनाला भेट देत आहेत.

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget