एक्स्प्लोर

व्यभिचारासाठी फक्त पुरुषाला शिक्षा देणाऱ्या कायद्याची समीक्षा

एखाद्या विवाहितेशी तिच्या पतीच्या संमतीविना शारीरिक संबंध ठेवले, तर त्या पुरुषाला पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. मात्र महिलेवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

नवी दिल्ली : विवाहित महिलेने परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवले, तर त्याची शिक्षा फक्त पुरुषालाच का? सुप्रीम कोर्ट याच्याशी निगडीत कायद्याची समीक्षा करणार आहे. यासंबंधात दाखल झालेल्या याचिकेवरुन केंद्राला नोटीस पाठवून उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. महिलांची खटल्यातून सुटका व्यभिचाराची परिभाषा मांडणाऱ्या भादंवि कलम 497 मध्ये फक्त पुरुषांना शिक्षेची तरतूद आहे. एखाद्या विवाहितेशी तिच्या पतीच्या संमतीविना शारीरिक संबंध ठेवले, तर त्या पुरुषाला पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. मात्र महिलेवर कोणतीही कारवाई केली जात नाही. याचिकाकर्त्याने हा कायदा लैंगिक भेदभाव करत असल्याचं म्हटलं आहे. महिलेलं संपत्ती म्हणून पाहणं चुकीचं दीडशे वर्ष जुना असलेला हा कायदा निरर्थक असल्याचं केरळचे याचिकाकर्ते जोसेफ शाईन यांनी म्हटलं आहे. ज्यावेळी महिलांची सामाजिक परिस्थिती कमकुवत होती, तेव्हा हा कायदा तयार करण्यात आला होता. त्यामुळे व्यभिचारासारख्या प्रकरणांमध्ये त्यांना पीडितेचा दर्जा देण्यात आला होता. आजच्या काळातील महिलांची स्थिती मजबूत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठासमोर सांगितलं. जर एखादी स्त्री आपल्या इच्छेने परपुरुषाशी (विवाहबाह्य) संबंध ठेवत असेल, तर तो खटला फक्त त्या पुरुषावरच नाही, तर महिलेवरही चालायला हवा. तिला कारवाईतून कुठलीही सूट देऊ नये. ही सूट लैंगिक समानतेच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले. खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. 'कायदा लैंगिक बाबतीत भेदभाव करत नाही. मात्र हे एकमेव कलम याला अपवाद आहे. त्यामुळे याबाबत विचार करण्याची गरज आहे' असं कोर्टाने म्हटलं. पतीच्या संमतीविना परपुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या महिलेवर कारवाई न होणं, ही महिलेला संपत्तीसमान वागणूक दिली जात असल्याचं द्योतक आहे, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. पत्नीला तक्रारीचा अधिकार नाही कलम 497 अंतर्गत पती पत्नीच्या व्यभिचाराची तक्रार करु शकतो, मात्र पतीच्या अशा विवाहबाह्य संबंधाची तक्रार पत्नी करु शकत नाही, यावरुनही कोर्टाने प्रश्न उपस्थित केले. सद्यस्थितीत हा कायदा काही बाबतीत पुरुषांशी, तर काही बाबतीत स्त्रियांशी भेदभाव करतो, असंही सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. यापूर्वी 1954, 2004 आणि 2008 मध्ये कलम 497 मध्ये बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मात्र नव्या याचिकेवर पाच जजेसच्या संविधान पीठात सुनावणी होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Embed widget