एक्स्प्लोर

Success Story:  एक लेखानं बदललं आयुष्य;सुंदर अन् डॅशिंग IAS सोनलचा भन्नाट प्रवास, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स

IAS Sonal Goel success story : सोनल गोयल आयएएस म्हणून आपल्या कामातून डॅशिंग आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

IAS Sonal Goel success story : आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. यूपीएससी पास (UPSC Latest Update) होणं अनेकांचं ध्येय असतं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेला दरवर्षी लाखो उमेदवार हजेरी लावतात. त्यात काहींना मेहनतीचे फळ मिळतं अन् ते प्रशासनात येतात. अनेकजण दरवर्षी या परीक्षेची तयारी करतात मात्र काहींनाच यात यश मिळतं. या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्याही चांगली आहे.  यातील काहींच्या स्टोरी खूप प्रभावी आणि प्रेरणादायी असतात.यातलंच एक नाव आहे IAS सोनल गोयल (Sonal Goel) यांचं.

सोनल गोयल आयएएस म्हणून आपल्या कामात डॅशिंग आहे,तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही सोनलचा करिष्मा जास्त आहे.तिचे इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती सतत आपले सुंदर फोटो देखील शेअर करत असते.  

सोनल गोयल ही हरियाणाच्या पानिपतमधील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. सोनल गोयलने यूपीपीएससी परीक्षेत 13 वी रँकिंग मिळवून आयएएस होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले.तिनं शालेय शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले. बारावीनंतर सोनलने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले. नंतर तिनं दिल्लीच्याच एका कॉलेजमधून कंपनी सचिवाची पदवीही मिळवली.

 सोनल गोयलचा IAS होण्याचा प्रवास नेमका कसा....

सोनल गोयलने कधीही आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. तिचं आयएएस अधिकारी होणं हा खरंतर योगायोग म्हणावा लागेल. तिला नागरी सेवा परीक्षेबद्दल फारशी माहितीही नव्हती. पण एकदा तिनं एका मासिकात प्रशासकीय सेवेवरचा लेख वाचला. या लेखामुळे तिला आयएएस अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर सोनलने आयएएसच्या परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
 
सीएसच्या अभ्यासादरम्यानच सोनलने आयएएस अधिकारी होण्याच्या निर्णयाबद्दल तिच्या कुटुंबाला कळवले होते. पण  सोनलने यूपीएससीची तयारी करावी असे तिच्या वडिलांना वाटत नव्हते. वडिलांना असं वाटायचं की, UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. अशा स्थितीत आपल्या मुलीच्या क्षमतेवर विश्वास असूनही सोनलने आयएएसच्या तयारीसोबतच बॅकअपमध्ये दुसरा पर्यायही तयार ठेवावा, असं वडिलांना वाटायचं.

एलएलबी आणि यूपीएससीची एकत्र तयारी अन् घवघवीत यश

सोनल गोयलने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यासोबतच तिनं वडिलांच्या सल्ल्यानं दिल्ली विद्यापीठात एलएलबीसाठी प्रवेशही घेतला. इतकंच नाही तर ती अभ्यासासोबतच सीएस म्हणून काम देखील करायची. सोनल गोयलने 2006 मध्ये पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली पण ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर, सोनलने पुढच्या वर्षी म्हणजे 2007 मध्ये कठोर परिश्रमाने दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि यावेळी ती 13 वी रँक घेत आयएएस म्हणून सिलेक्ट झाली.

ही बातमी देखील वाचा

success story : ही कुणी हिरोईन नाही तर धडाकेबाज IAS अधिकारी! सुंदरतेत दिग्गज अभिनेत्रींना टाकते मागे, खासच आहे स्टोरी...

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget