एक्स्प्लोर

देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

मासिक पाळी असताना विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी, मध्य प्रदेशातील 'या' विद्यापीठाचा मोठा निर्णय  

 मध्य प्रदेशासह (Madhya Pradesh) देशातील हे पहिले विधी विद्यापीठ असून, विद्यार्थिनींच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या धर्मशास्त्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने (DNLU) विद्यार्थिनींना मासिक पाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यापीठाने ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या नवीन सत्रापासून विद्यार्थीनींसाठी मासिक पाळीच्या रजेचा आदेश जारी केला आहे.  (वाचा सविस्तर)

महाराष्ट्रात एक जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 96 टक्के पावसाची नोंद, तर देशात एकूण सरासरीच्या 94 टक्के पाऊस

देशातील काही भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे तर काही भागात कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार 1 जूनपासून आत्तापर्यंत देशात सरासरीच्या 94 टक्के पाऊस झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 96 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या आठवड्यात राज्यातून मान्सून माघारी परतण्यास सुरुवात होणार आहे. (वाचा सविस्तर)

 चेन्नईत मुसळधार पाऊस, पेट्रोल पंपाचे छत कोसळले, एकाचा मृत्यू, 7 जण जखमी 

चेन्नई, तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) सध्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, सैदापेठ परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाचे छत कोसळले. या अपघातात 7 जण जखमी झाले आहेत. (वाचा सविस्तर)

 मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपचा डाव यशस्वी होणार? आज निवडणूक झाल्यास कोण जिंकणार?

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (Madhya Pradesh Election 2023) आता दोन-तीन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेआधी होणारी ही निवडणूक सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेससाठी (Congress) महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत असणार आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. भाजपने आपल्या निवडणूक रणनीतीमध्ये बदल केला आहे.
(वाचा सविस्तर)

कोरियन गायिकेची अद्भूत कलाकृती! 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये गायलं 'डोरेमॉन'चं टायटल साँग; लोकांकडून कौतुक 

डोरेमॉन (Doraemon) हे कार्टून फक्त भारतातच नाही, तर जगभरातील (World) विविध देशांमध्ये मोठ्या आवडीने पाहिलं जातं. जगातील प्रत्येक लहान मुलगा डोरेमॉन या पात्राला ओळखत असेल, एवढी त्याची प्रसिद्धी (Popularity) आहे. प्रत्येक देशात त्या-त्या भाषांमध्ये डोरेमॉन प्रदर्शित केलं जातं, याचं टायटल साँग देखील (Doraemon Title Song) प्रत्येक ठिकाणी वेगळ्या अंदाजात गायलं गेलं आहे.  (वाचा सविस्तर)

 विश्वचषकाआधी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली, 12 वर्षांनंतर भारत पुन्हा चषक उंचवणार का?

रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया क्रिकेटच्या महाकुंभासाठी सज्ज आहे. 12 वर्षांपासून भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धेत यश मिळाले नाही. भारतीय संघ सध्या वनडेमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाला विश्वचषकाचा पुन्हा एकदा दावेदार म्हटले जातेय. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. दोघेही करिअरच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. (वाचा सविस्तर)

30th September In History : लातूरमधील किल्लारीच्या भूकंपामुळे महाराष्ट्र हादरला, 10,000 हजार लोकांनी गमावलं आयुष्य; आज इतिहासात 

 इतिहासात आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी ठरल्या आहेत. तर महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस हा काळरात्रीचा ठरला. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यात भूकंप झाला आणि त्यामध्ये सुमारे दहा हजार लोकांनी आपलं आयुष्य गमावलं. तर आजच्याच दिवशी  आजच्याच दिवशी जोधपुरातील एका मंदिरात गोंधळ माजला आणि त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. (वाचा सविस्तर)

Horoscope Today 30 September 2023 : आजचा शनिवार 'या' राशीच्या लोकांसाठी सावधानतेचा, आजचे राशीभविष्य

 ज्योतिषशास्त्रानुसार, 30 सप्टेंबर 2023, शनिवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज कन्या राशीचे लोक सामाजिक कार्यात व्यस्त राहतील, जर तुमच्या मनात काही नवीन कल्पना आली तर लगेच त्याचा पाठपुरावा करा, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. इतर राशीच्या लोकांसाठी शनिवार काय घेऊन आला आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य   (वाचा सविस्तर)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget