Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Supreme Court : सुप्रीम कोर्टाकडून 104 वर्षीय वृद्ध रसिक चंद्र मंडल याला जामीन मंजूर करण्यात आलाय.
104 Year Old Rasik Chandra Mandal Case : सुप्रीम कोर्टाने 104 वर्षीय वृद्ध रसिक चंद्र मंडल याला जामीन मंजूर केलाय. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला आहे. 1988 मधील एका हत्याप्रकरणात रसिक चंद्र मंडल दोषी आढळले होते. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आता ट्रायल कोर्टाच्या अटींच्या आधारे त्यांची तात्पुरती सुटका होणार आहे.
रसिक चंद्र मंडल या वृ्द्धाला 1988 मधील एका हत्याकांडात 1994 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. तेव्हा त्यांचं वय 68 इतकं होतं. रसिक चंद्र मंडळ याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर या वृद्धाने त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या विरोधात वारंवार कोर्टात धाव घेतली होती. 2018 मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता.
2020 मध्ये वृद्धाकडून सु्प्रीम कोर्टात सुटका करण्याची मागणी
रसिक मंडल याने 2020 मध्ये सुप्रीम कोर्टात एक नवी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये वृद्धापकाळ आणि आजारपणाचे कारण देत त्यांने मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी दिलासा मिळावा म्हणून न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आणि 2021 मध्ये तो गांभीर्याने घेतला.
सुप्रीम कोर्टा मोठा मोठा निर्णय
सातत्याने वाढत असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि वृद्धापकाळाचा विचार करुन सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी (29 नोव्हेंबर) मंडल यांना अंतरिम जामीन देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याची परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय घेतला. पश्चिम बंगाल मधील वकील आस्था शर्मा यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना सांगितले की, मंडलची शारीरिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि तो लवकरच त्यांचा 104 वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानंतर न्यायालयाकडून त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर रसिक मंडल याला मोठा दिलासा मिळालाय. पुढील काही दिवसांमध्ये मंडळ पुढील काही दिवसांमध्ये तुरुंगातून बाहेर येईल, असेही बोलले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या