एक्स्प्लोर

Madhya Pradesh Election 2023 : मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपचा डाव यशस्वी होणार? आज निवडणूक झाल्यास कोण जिंकणार?

Madhya Pradesh Election Opinion Polls : टाइम्स नाऊ-नवभारतने मध्य प्रदेश निवडणुकीच्या आधी सर्वेक्षण केले आहे. दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत दिसून येणार आहे.

नवी दिल्लीमध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (Madhya Pradesh Election 2023) आता दोन-तीन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेआधी होणारी ही निवडणूक सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेससाठी (Congress) महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत असणार आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. भाजपने आपल्या निवडणूक रणनीतीमध्ये बदल केला आहे. तर, काँग्रेसमध्ये आत्मविश्वास असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान, टाइम्स नाऊ-नवभारतने एक सर्वेक्षण (Opinion Poll) केले आहे. 

सर्वेक्षणानुसार, दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत दिसून येणार आहे. 20 सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दोन महिन्यांच्या आकडेवारीच्या आधारे हा सर्वे अहवाल तयार करण्यात आला आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रोष असल्याचे चित्र आहे. काँग्रेस सत्ता स्थापन करणार असली तरी त्यांना झगडावे लागणार असल्याचे सर्वेतील कल सांगत आहे. 

कोणत्या पक्षाला किती जागा?

राज्यात आता विधानसभा निवडणुका झाल्या तर भाजपला 102 ते 110 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर काँग्रेसला 118 ते 128 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, 2023 च्या निवडणुकीत भाजपला 42.8 टक्के मते मिळू शकतात. त्याचवेळी काँग्रेसला 43.8 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 13.40 टक्के मते मिळू शकतात.

भाजपकडून दिग्गज उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिग्गजांना मैदानात उतरवले आहे. राज्यात तीन केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाही. यापूर्वीही अनेक सर्वेक्षण अहवालांमध्ये भाजपविरोधात नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या, त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. 

मध्य प्रदेशच्या निवडणुकीत सात खासदारांना ज्यात तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश त्या सगळ्यांना विधानसभेसाठीचं तिकीट देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नरेश तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते यांना भाजपनं विधानसभेत लढायला सांगितलंय. सोबत भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनाही बऱ्याच वर्षानंतर निवडणुकीत उतरायला सांगितलंय. 

मध्य प्रदेशात निवडणुका जाहीर होण्याआधी भाजपनं आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्यात. या आआधी 17 ऑगस्टला पहिली यादी जाहीर झाली होती. त्यात 39 आणि सोमवारच्या यादीतही 39 जणांची नावं जाहीर झाली. निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजपने पहिल्यांदाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

सर्वेक्षणावर भाजप-काँग्रेसने काय म्हटले?

निवडणूकपूर्व चाचणी अंदाजावर बोलताना भाजपने म्हटले की, 20 सप्टेंबरपर्यंतचा हा सर्वे आहे. पक्षाने आपल्या निवडणुकीत रणनीतीमध्ये 20 सप्टेंबरनंतर बदल केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येईल, असा दावा भाजपने केला आहे. तर, काँग्रेसच्या नेत्यांनी मध्य प्रदेशमध्ये 140 जागांवर विजय मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget