एक्स्प्लोर

'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल

गावातील उत्तम जानकर यांच्या गटाने हे मतदान व मतमोजणी घेण्याची भूमिका घेतली. या मतमोजणीतून ग्रामस्थांच्या शंका दूर होतील असा विश्वास वाटत असल्याचं विजयी उमेदवार उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे.

सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम (EVM) संशयाच्या भोवऱ्यात आहे. राज्यात भाजप महायुतीला तब्बल 237 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्याने ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दुसरीकडे सरकारकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जात असून ईव्हीएमविरोधात विरोधकांनी मोठं आंदोलन उभा करण्याचं ठरवलंय. त्यातच, माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे जाऊन ज्या उमेदवाराला ईव्हीएमवर मतदान केलं, आता त्याच उमेदवाराला बॅलेट पेपरवर मतदान करा, असे आवाहन करत 3 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा मतदान घेण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा राबविण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीत गडबड झाल्याचा आक्षेप घेत माळशिरस (Malshiras) तालुक्यातील मारकडवाडी येथे 3 डिसेंबर रोजी बॅलेट वर मतदान घेतले जाणार आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत हा निर्णय घेत प्रशासनाला तशा पद्धतीचे निवेदन देखील दिले आहे. मात्र, आता हे मतदान व ही मतमोजणी माध्यमांच्या देखरेखित होणार असून याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी देखील पूर्ण होणार आहे. 
    
गावातील उत्तम जानकर यांच्या गटाने हे मतदान व मतमोजणी घेण्याची भूमिका घेतली. या मतमोजणीतून ग्रामस्थांच्या शंका दूर होतील असा विश्वास वाटत असल्याचं विजयी उमेदवार उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. याशिवाय ज्यांनी मतदान केलं त्यांची मते नेमकी कुठे जातात हेही समोर येणार असून यातून ईव्हीएम मशीनची पोलखोल होऊ शकेल. माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात या पद्धतीची भावना तयार झाली असून मोहिते पाटील व जानकर गट एकत्र आल्याने किमान दीड लाखाच्या फरकाने आपण विजयी होणार असा विश्वास प्रत्येकाला होता. मात्र, मतमोजणी झाल्यावर केवळ तेरा हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवल्याने संपूर्ण तालुक्यात आक्रोश असल्याचे जानकर यांनी म्हटलं आहे. जे गाव माजी आमदाराला माहीत नव्हते, जो कधी तिकडे गेला नाही अशा गावातही जर त्याला मताधिक्य मिळत असेल तर लोकांची शंका निश्चित निरसन होणे गरजेचे असल्याचे जानकर यांनी म्हटलं. तसेच, या मतदान व मतमोजणीतून कायदेशीर दृष्ट्या काही साध्य होणार नसले तरी बॅलेट पेपरवर मतदान करून काय होते, हे तीन तारखेला समोर येणार आहे.

गावात झळकला बोर्ड

मारकडवाडी गावात मतदान जागृती करण्यासाठी डिजिटल बॅनर झळकले आहेत. ''मौजे मारकडवाडी (ता.माळशिरस) गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान पडताळणी प्रक्रिया पार पाडावयाची आहे. आपण दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, याची नोंद घ्यावी.'', अशा आशयाचा संदेश या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. 

उत्तम जानकर यांना कमी मतं, सातपुतेंना मताधिक्य

मारकडवाडी गावात यापूर्वी उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. मात्र, यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे. यंदाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचे सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे.

हेही वाचा

सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
Dattatray Gade Arrested : इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Commissioner Amitesh Kumar PC : नराधम दत्ता गाडे कसा सापडला? पुणे पोलिसांची UNCUT PCABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 February 2025Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखलABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 28 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
Dattatray Gade Arrested : इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Heatwave In March : मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Ajit Pawar : स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
Embed widget