Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Shardul Thakur : शार्दुल ठाकूरला बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघात पुनरागमन करता आलेले नाही. शार्दुल शेवटचे गेल्या वर्षी वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी मैदानात उतरला होता.
Shardul Thakur : अलीकडेच, सौदी अरेबियात इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला. या मेगा लिलावात सर्व 10 संघांनी भारतीय खेळाडूंवर प्रचंड पैसा खर्च केला. मात्र, असे काही खेळाडू होते जे विकले गेले नाहीत. त्यापैकी एक नाव शार्दुल ठाकूरचे आहे, ज्याला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शार्दूलला कोणत्याही संघाने का विकत घेतले नाही हे आता स्पष्ट झाले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरला वाईट पद्धतीने पराभव पत्करावा लागला, त्यामुळे मुंबईलाही पराभवाला सामोरे जावे लागले. गोलंदाजीत शार्दुलला एवढा फटका बसला की त्याच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला. शार्दुल ठाकूर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा देणारा खेळाडू ठरला आहे.
शार्दुल ठाकूरने 4 षटकात 69 धावा दिल्या
29 नोव्हेंबरला केरळविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. संघासाठी या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक ठरला तो शार्दुल ठाकूर. शार्दुल ठाकूरने मुंबईसाठी गोलंदाजी करताना भरपूर धावा दिल्या आणि त्याला एकच विकेट मिळाली. केरळकडून गोलंदाजी करताना शार्दुलने 4 षटकात 69 धावा दिल्या. केरळच्या फलंदाजांनी शार्दुलविरुद्ध 5 चौकार आणि 6 षटकार ठोकले. शार्दुलच्या आधी या स्पर्धेत अरुणाचल प्रदेशकडून खेळणाऱ्या रमेश राहुलने यंदा हरियाणाविरुद्ध 4 षटकांत 69 धावा दिल्या.
टीम इंडियामध्ये परतू शकलेला नाही
शार्दुल ठाकूरला बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघात पुनरागमन करता आलेले नाही. शार्दुल शेवटचे गेल्या वर्षी वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर शार्दुलला दुखापत झाली, त्यामुळे तो सध्या टीम इंडियामध्ये परतू शकलेला नाही. शार्दुलने टीम इंडियासाठी 11 कसोटी, 47 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत.
पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
दुसरीकडे, ज्याची प्रतिभा पाहून ICC (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) ने त्याला 'नेक्स्ट सचिन तेंडुलकर' म्हटले होते. तोच पृथ्वी शॉ इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात विकत घेतला गेला नाही. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अंडर-19 क्रिकेट संघात खेळलेले त्यांचे शुभमन गिल, रायन पराग, अर्शदीप सिंग करोडपती झाले आहेत. गेल्या आयपीएल लिलावात पृथ्वी शॉची मूळ किंमत फक्त 75 लाख रुपये होती. 9 नोव्हेंबर रोजी 25 वर्षांचा झालेला पृथ्वी शॉ आयपीएल 2022-24 पर्यंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता, ज्यासाठी त्याला प्रत्येक हंगामात 7.50 कोटी रुपये मिळाले. मात्र यावेळी तो रिकाम्या हाताचा राहिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या