सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी, 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण करणे आवश्यक आहे.
मुंबई : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी गुडन्यूज आहे. कारण, एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत असिस्टंट ऑफिसर पदासाठी जाहीरात निघाली आहे. एनटीपीसीमध्ये या पदासाठी 50 जागांवर भरती होणार असून त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासाठी, 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंमित मुदत आहे. शैक्षणिक अर्हतेचा विचार केल्यास इंजिनिअरींगची पदवी घेतलेल्या व डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांना येथे अर्ज करता येईल. तर, या पदासाठी वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षे असणार आहे. तर, एसटी आणि एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट असेल, तर ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षांची सूट आहे.
शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी, 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण करणे आवश्यक आहे. [ mechanical / electrical / civil / electronics / chemical / construction / production / instrumentation ] या फॅकल्टीतील उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पूर्णपणे वाचावी.
डिप्लोमाधारकांमध्ये ही शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे.
diploma / advance diploma / PG Diploma (industrial safety)
एनटीपीसीच्या 50 जागांसाठी निघालेल्या जाहिरातीमधील नोकरी सरकारी असल्याने व केंद्र सरकारशी संबंधित असल्याने देशभरात कुठेही नोकरीसाठी पाठवण्यात येईल.
भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत, त्यांना अर्ज भरतेवेळी परीक्षा शुल्क बंधनकारक आहे, 300 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. मात्र, एससी, एसटी, पीडब्लूडी आणि महिला उमेदवारांना फीमध्ये माफी देण्यात आलीय.
जनरल/ओबीसी/ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹300/-
एस सी/एस टी/PWD/ExSM/महिला: फ्री नाही.
वेतन किती
या नोकरीसाठी उमेदवारांना मूळ पगार ते सर्व भत्ते मिळून 30000 ते 120000 रुपये पगार देण्यात येणार आहे.
एनटीपीसीचं अधिकृत संकेतस्थळ : https://www.ntpc.co.in/en
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php
हेही वाचा
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल