Chennai Rains: चेन्नईत मुसळधार पाऊस, पेट्रोल पंपाचे छत कोसळले, एकाचा मृत्यू, 7 जण जखमी
Chennai Rains: तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे रस्ते ठप्प झाले आहेत.
Chennai Rains :चेन्नई, तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) सध्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, सैदापेठ परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाचे छत कोसळले. या अपघातात 7 जण जखमी झाले आहेत.
VIDEO | A portion of a roof at a petrol pump collapsed in Saidapet, Chennai amid heavy rainfall. Fire and safety officials are on the spot to rescue people who are stuck under the debris. No casualties reported so far. pic.twitter.com/BRkIcLQLnT
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2023
चेन्नईमधील दुर्घटना
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये सध्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी मुसळधार पावसात चेन्नईच्या सैदापेट भागात असलेल्या पेट्रोल पंपाचे छत कोसळले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. यानंतर तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींवर उपचार सुरू असल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.
VIDEO | Severe traffic jam in Velachery area of Chennai, Tamil Nadu following heavy rainfall in the region. pic.twitter.com/GLlKhPBQ2Z
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2023
मृत व्यक्ती हा पेट्रोल पंपाचा कर्मचारी
या अपघातात कंधासामी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे चेन्नई पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्ती हा पेट्रोल पंपाचा कर्मचारी होता. या घटनेनंतर अग्निशमन दलासह पोलीस, महापालिका कर्मचारी तसेच स्थानिक लोक मदत आणि बचावकार्यात गुंतले होते. या पेट्रोल पंपाच्या छतावर मुसळधार पावसामुळे आधीच पाणी साचल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत पावसाचा जोर अधिक असताना छतावर अधिक भार पडला होता, तो सहन न झाल्याने छत अचानक खाली पडले.
#WATCH | Tamil Nadu: Rescue operation underway after the roof of a petrol pump collapsed in Saidapet, Chennai following heavy rainfall in the area. Six people got injured. pic.twitter.com/fgbNzXluXn
— ANI (@ANI) September 29, 2023
पावसामुळे रस्त्यांवर जाम
तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर चेन्नईमध्ये काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे रस्ते ठप्प झाले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.