(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Honey Trap : हनी ट्रॅपमध्ये असा अडकला की भारताची गुपितं पाकिस्तानला दिली; नौदल हेरगिरीप्रकरणी आणखी एकाला अटक
NIA Charge Sheet In Indian Navy Honey Trap Case : एनआयएने गुरुवारी पाकिस्तानी गुप्तचर एजंटांचा समावेश असलेल्या भारतीय नौदलाच्या हेरगिरी प्रकरणात आणखी एका व्यक्तीविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे.
मुंबई: भारतीय नौदलाच्या हेरगिरी प्रकरणात आणखी एका व्यक्तीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अमन सलीम शेख आरसी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, ज्याने भारतीय नौदलाच्या जवानांना हनी ट्रॅप करण्यासाठी पाकिस्तानी एजंट्सशी संगनमत करून संरक्षण आस्थापनांची गुप्त माहिती गोळा केल्याचं एनआयएने (NIA) आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
एनआयएने मुंबईतील रहिवासी असलेल्या अमन सलीम शेख आरसी या व्यक्तीवर आयपीसी आणि यूएपीए कायद्याच्या अनेक कलमांखाली आरोप केले आहेत. एजन्सीने विशाखापट्टणम येथील विशेष एनआयए न्यायालयात (Special NIA Court) आरोपपत्र दाखल केले.
क्रिप्टोच्या माध्यमातून पैशाचा व्यवहार
नौदल हेरगिरी प्रकरण 5 जून 2023 रोजी एनआयएकडे आले. या तपासादरम्यान एनआयएला आढळले की अमन संशयित पाकिस्तानी एजंट उस्मानसोबत देशविरोधी कट करण्यासाठी काम करत होता. पाकिस्तानी गुप्तहेरांनी नेमून दिलेले काम पूर्ण करण्यासाठी तो क्रिप्टो चॅनलद्वारे पैसे घेत असे. हे क्रिप्टो चॅनल त्याला मीर बालाझ खान, अल्वेन आणि इतर काही संशयित पाकिस्तानी गुंडांनी पुरवले होते.
प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी बनला ISI एजंट
बिहारमधील तरुण हनी ट्रॅपमध्ये फसून आयएसआय एजंट (ISI Agent) बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीआयडीने बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका पाकिस्तानी गुप्तहेरला भरूचमधून अटक केली आहे. प्रवीण मिश्रा असं त्याचं नाव असून त्याची चौकशी सुरू आहे.
प्रवीण मिश्रा त्याच्या प्रेयसीला सोशल मीडियावर इंप्रेस करण्यासाठी ISI एजंट बनल्याचं समोर आलं आहे. फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून पाकिस्तानच्या गुप्तचर एजंटने त्याला हनीट्रॅपमध्ये फसवल्याचं तपासात समोर आलं आहे.
एका पाकिस्तानी आयएसआय एजंटने सोनल गर्ग या नावाने सोशल मीडियावर फेक प्रोफाईल बनवलं आणि त्या माध्यमातून प्रवीण मिश्राला हनीट्रॅपमध्ये फसवलं. मेसेजिंगच्या माध्यमातून त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर व्हॉट्सॲप नंबरची देवाणघेवाण झाली. यानंतर आयएसआय एजंटने सोनल गर्गने प्रवीणला आयएसआय एजंट होण्यासाठी प्रवृत्त केलं आणि गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी प्रवीण ISI एजंट बनवून पाकिस्तानला माहिती पुरवू लागला.
प्रवीण हा मूळचा बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे. तो गुजरातमधील अंकलेश्वर जीआयडीसीमध्ये इंजिनियर पदावर कार्यरत होता. तेथून त्याला अटक करण्यात आली.
ही बातमी वाचा: