Income Tax : आयकर भरणाऱ्यांची संख्या एका वर्षात अर्धी का झाली?
अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने कर वाचवायचा प्रयत्न करतात त्यामुळे प्रामाणिक करदात्यांवर जास्त भार येतो. मोदींच्या या वक्यव्यावरून वाद निर्माण झाला होता आणि हे आकडे खोटे असल्याची टीका झाली होती. त्यानंतर आयकर खात्यानं याबाबत स्पष्टीकरण जारी केलं आहे. याबाबत आयकर विभागाच्या ट्विटर हॅन्डलवरून माहिती देण्यात आली आहे.
Income Tax payers in India : 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त 1.5 कोटी लोक कर भरतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 फेब्रुवारी रोजी टाइम्स नाउ समिटमध्ये सांगितलं. एवढ्या मोठ्या देशात फक्त 1 टक्के लोक कर भरत असण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. एवढचं नाहीतर यापेक्षाही अधिक हैराण करणारा आकडा म्हणजे, करदात्यांची संख्या वाढण्याऐवजी मागील एका वर्षात कमी होऊन अर्धी झाली आहे.
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने कर वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे प्रामाणिक करदात्यांवर जास्त भार येतो. मोदींच्या या वक्यव्यावरून वाद निर्माण झाला आणि हे आकडे खोटे असल्याची टीका विरोधकांनी केली. त्यानंतर आयकर खात्यानं याबाबत स्पष्टीकरण जारी केलं आहे. याबाबत आयकर विभागाच्या ट्विटर हॅन्डलवरून माहिती देण्यात आली.
आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, 2018-2019 या आर्थिक वर्षात 3.29 कोटी लोकांनी आयकर भरला होता. परंतु, 2019-20मध्ये हा आकडा 55 टक्क्यांनी घटून 1.46 कोटींवर आला आहे. म्हणजेच, 2019-20 वर्षात फक्त 1.46 कोटी लोकांनी आयकर भरला आहे. आता सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे, आयकर भरणाऱ्या लोकांची संख्या 1 कोटी 83 लाखांनी कमी कशी झाली? याचं उत्तर फेब्रुवारी 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पात दडलं आहे. 2019-20मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं होतं.
नव्या टॅक्सस्लॅबनुसार, डिसेंबरपर्यत 5 कोटी 70 लाख लोकांनी आयकर परतावा भरला मात्र त्यातील 4 कोटी 32 लाख करदात्यांना 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्यामुळे कर भरावाच लागला नाही. याचाच उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणारांची संख्या 4 टक्क्यांनी वाढल्याचं दिसतंय, ही संख्या 1 कोटी 49 लाख इतकी आहे. त्यामुळे साहजिकच अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदीनुसार, कर भरणाऱ्या एका मोठ्या वर्गाला करातून सूट मिळाली.
5 लाखांपेक्षा कमी आहे 4.3 लोकांचं उत्पन्न
आकड्यांनुसार, डिसेंबरपर्यंत देशातील 5.7 कोटी लोकांनी आयटीआर फाइल केला, ज्यामध्ये 4.3 कोटी लोकांनी आपली कमाई 5 लाख रूपयांपर्यंत दाखवली होती. त्यामुळे 2019मधील अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदीमुळे भारतात इनकम टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. तर 2018-19मध्ये झिरो टॅक्स असणाऱ्या लोकांच्या संख्या 2.2 कोटी होती.
दरम्यान, गेल्या पाच वर्षात दीड कोटी गाड्यांची विक्री झाली आहे. तर 3 कोटींपेक्षा जास्त भारतीयांनी कामासाठी विदेशवारी केली आहे. मात्र फक्त दीड कोटी लोकच आयकर भरतात. अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने कर वाचवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांवर जास्त भार येतो. एवढचं नाहीतर जवळपास 1 कोटी व्यक्तींचं उत्पन्न 5 ते 10 लाखांच्या दरम्यान तर 46 लाख करदात्यांचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त होतं. फक्त 3 लाख 16 हजार करदात्यांनी 50 लाखांपेक्षा जास्तीचं उत्पन्न जाहीर केलं आहे. देशातील फक्त 8 हजार 600 व्यक्तींनी 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असल्याचं जाहीर केलं. 2200 डॉक्टर्स, इंजिनिअर्स, सीए, वकील, बॉलिवूड आणि इतर व्यावसायिक(Professional) असे आहेत ज्यांनी 1 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न जाहीर केलं आहे.
संंबंधित बातम्या :
#UnionBudget2020 | कोणती कर प्रणाली निवडावी? नीट विचार करुन निर्णय घ्या!
Budget 2020 | सरकारचा मोठा निर्णय : LIC मधील समभाग विकणार
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये निराशा; सेन्सेक्स 988 अंकांनी कोसळला