एक्स्प्लोर
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये निराशा; सेन्सेक्स 988 अंकांनी कोसळला
केंद्रीय अर्थसंकल्पाचे पडसाद मुंबई शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळाले असून 988 अंकांनी सेन्सेक्स कोसळत बाजार बंद झाला आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 988 अंकांनी कोसळला आहे. विमा क्षेत्रातील कंपन्यांसह वाहन उद्योग, पायाभूत सुविधा व धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचीही मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आल्याने त्यांच्या शेअर्सचे भाव गडगडले आहेत.
एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतील भागिदारी सरकार विकणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आयडीबीआय बँकेच्या शेअर्सना मागणी आल्याचे दिसले. आयडिबीआय बँकेचा शेअर काही प्रमाणात वधारला. मात्र, बहुतेक सर्व क्षेत्रांमधल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीचा कल दिसून आल्यामुळे सेक्टोरियल इंडायसेसमध्ये पडझड झाल्याचे बघायला मिळाले.
Budget 2020 | कर रचनेत बदल, करदात्यांना किंचित दिलासा
एलआयसीमधील समभाग विकणार -
आयपीओच्या माध्यमातून सरकार भारतीय आयुर्विमा महामंडळातील(एलआयसी)भागभांडवल कमी करेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. याचे परिणाम शेअर बाजारावर दिसून आले आहे. एप्रिलमध्ये पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस एलआयसीची यादी सरकार करणार आहे. शेअर बाजारावर एलआयसीची यादी बनविण्याचा हा निर्णय म्हणजे सरकारचा महसूल वाढविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.
Budget 2020 | स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा अधिशेष 2018-19 मध्ये 9.9 टक्क्यांनी वाढून 2 53.14 अब्ज रुपये झाला आहे. ही पहिलीच वेळ होती जेव्हा एलआयसीच्या अधिशेषने 500 अब्ज रुपयांची पातळी ओलांडली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीमुळे 18,000 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा नाही. तथापि, एका अधिकाऱ्याने सांगितले की, एलआयसीला शेअर बाजारात लिस्टेड करणे अवघड आहे, कारण त्याची मोठी गुंतवणूक रिअल इस्टेट, कला आणि इक्विटी बाजारामध्ये आहे, ज्याच्या किंमतीत वेळ लागू शकेल. दरम्यान, बाजार बंद होताना सेन्सेक्स 987.96 अंकांनी घसरला आणि 39,735.53 वर स्थिरावला.
Budget Economic Survey | अर्थसंकल्पाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल कसा काढला जातो? काय आहे आर्थिक सर्वेक्षण अहवाल?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement