एक्स्प्लोर

K Sudhakar : लोकसभेचं मैदान मारलं, भाजप खासदारानं विजयाची पार्टी ठेवली, ट्रकनं दारु आणली, पोलिसांच्या उपस्थितीत वाटप,लोकांच्या रांगा   

K Sudhakar : कर्नाटकमधील भाजपचे चिक्कबल्लापूरचे खासदार के. सुधाकर यांच्या विजयाच्या पार्टीत खुलेआम दारु वाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे पोलिसांसमोर हा सर्व प्रकार सुरु होता. 

चिक्कबल्लापूर : कर्नाटकमधील चिक्कबल्लापूरचे भाजप खासदार के सुधाकर (K Sudhakar) यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानिमित्त एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ही पार्टी (Victory Party) एका कारणानं चर्चेत आली आहे. या पार्टीत खुलेआम दारुच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलं. कार्यकर्त्यांना दारुचं वाटप करण्यासाठी ट्रकमधून दारु आणली गेली होती. दारुच्या बाटल्या मिळाव्यात यासाठी कार्यकर्त्यांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. पोलिसांनी  या पार्टीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.    

एएनआय या वृत्तसंस्थेनं या पार्टीतील एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यामध्ये लोक दारु मिळवण्यासाठी शिस्तबद्धलरित्या रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळतं. 

विशेष बाब म्हणजे खासदार के सुधाकर यांनी पोलिसांना एक पत्र लिहून या पार्टीसाठी सुरक्षा मागितली होती. त्या पत्रात दारु वाटली जाणार असल्याचं देखील म्हटलं होतं. भाजप खासदार के सुधाकर यांच्या पत्रानुसार साडे बारा वाजता ही पार्टी सुरु होईल आणि त्यात जेवण आणि दारुची व्यवस्था करण्यात येणार असल्याचा उल्लेख होता. 

बंगळुरु ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सीके बाबा यांनी उत्पादन शुल्क विभागानं या पार्टीला परवानगी दिली होती. पोलिसांना यासाठी सुरक्षा पुरवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रकरणामध्ये पोलिसाचा काही दोष नाही, ही जबाबदारी  उत्पादन शुल्क विभागाची आहे कारण त्यांनी परवानगी दिली, असं सीके बाबा यांनी म्हटलं.  सीके बाबा यांनी आयोजकांना अल्कोहोल म्हणजेच दारुचं वाटप करु नये, नियमांचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करु असा इशारा देखील दिला होता. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडे या इंग्रजी वेबसाईटनं दिलं आहे.

पाहा व्हिडीओ :

भाजपच्या के सुधाकर यांनी लोकसभा निवडणुकीत चिक्कबल्लापूर मतदारसंघात काँग्रेसच्या एमएस रक्षा रामैय्या यांना दीड लाख मतांनी पराभूत केलं होतं.  

ट्रकमधून दारु आणली, लोकांनी रांगा लावल्या

के. सुधाकर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत ट्रकमधून दारुच्या बाटल्यांचे बॉक्स आणण्यात आले होते. दारुच्या बाटल्या घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. रांगा लावत लोकांनी दारुच्या बाटल्या मिळवल्या. हा सर्व प्रकार सुरु असताना पोलीस देखील तिथं उपस्थित होते.

या पार्टीचे व्हिडीओ व्हायरल

भाजप खासदार के. सुधाकर यांच्या पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होते. या पार्टीसंदर्भात आरोप प्रत्यारोप राजकारण्यांकडून सुरु झाले आहेत.

संबंधित बातम्या :

Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 25 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सManikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?Zero Hour Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायचंय?Zero Hour : चाणाक्ष नेते,उत्तम वक्ते,लाडके राज्यकर्ते; Atal Bihari Vajpayee सारखा नेता होणे नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
Embed widget