एक्स्प्लोर

तांदळासह डाळींचं उत्पादन वाढणार, देशातील 70 कोटींहून अधिक लोकांना मिळणार दिलासा 

Rice and Pulses News : खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यानं डाळी (Dal) आणि तांदळाच्या (Rice) उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय.

Rice and Pulses News : शेतकऱ्यांसह (Farmers) देशातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यानं डाळी (Dal) आणि तांदळाच्या (Rice) उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय. त्यामुळं येत्या काही महिन्यांत सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) चिंता करावी लागणार नाही. डाळी आणि तांदळाचं उत्पादन वाढलं तर किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. यामुळं देशातील 70 कोटी जनतेला दिलासा मिळणार आहे. 

मागील वर्षी तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली होती. देशाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकारने निर्यातीवरही बंदी घातली होती. अशीच स्थिती डाळींमध्येही दिसून आली. आता मात्र, डाळ आणि तांदळाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. यातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. देशातील सुमारे 70 कोटी म्हणजेच 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तांदळावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भाताच्या उत्पादनात झालेली अंदाजे वाढ ही अशा लोकांसाठी चांगली बातमी आहे. 

भात लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ

मान्सूनच्या चांगल्या पावसामुळं चालू खरीप हंगामात (उन्हाळी पेरणी) भात पिकाखालील क्षेत्रात आतापर्यंत 7 टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर भाताचे क्षेत्र 166.06 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 19 जुलैपर्यंत 155.65 लाख हेक्टरवर भाताची पेरणी झाली होती. याचा अर्थ येत्या काही महिन्यांत तांदळाचे उत्पादन वाढल्याने भावावर लक्षणीय परिणाम होणार आहे. सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार नाही. भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी 70 कोटी म्हणजेच 50 टक्क्यांहून अधिक लोक तांदळावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत तांदळाचे भाव वाढल्याने अशा लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता देशात तांदळाचे उत्पादन वाढले तर सर्वसामान्यांना कमी दरात तांदूळ उपलब्ध होईल.

डाळींचे उत्पादनही वाढणार

कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै 2024 पर्यंत खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढीची आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढून 85.79  लाख हेक्टर झाले आहे. जे गेल्या हंगामात 70.14 लाख हेक्टर होते. भरडधान्य पेरणीखालील क्षेत्र कमी म्हणजे 123.72 लाख हेक्टर आहे, जे एका वर्षापूर्वी 134.91 लाख हेक्टर होते. या खरीप पेरणी हंगामात अखाद्य श्रेणीतील तेलबियांचे क्षेत्र आतापर्यंत 163.11 लाख हेक्टर आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 150.91 लाख हेक्टर होते.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! सरकारनं तांदूळ निर्यातबंदी उठवली, 'या' देशाला करणार 14 हजार टन तांदळाची निर्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?Bajrang Sonawane : Santosh Deshmukh हत्या प्रकरण संसदेत गाजलं, बजरंग सोनावणेंची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Embed widget