Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Shashi Tharoor : सोशल मीडियावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचा जुना फोटो व्हायरल केला जात आहे. ज्यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून येतं. विश्वास न्यूजच्या पडताळणीत दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचा एक फोटो व्हायरल होते आहे. ज्यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं पाहायला मिळतं. नेटकरी हा फोटो सध्याच्या काळातील असल्याचं सांगत खोटे दावे व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूजच्या पडताळणीत असे दावे चुकीचे असल्याचं समोर आलं. शशी थरुर यांचा हा फोटो 2022 मधील असल्याचं स्पष्ट झालंय. संसदेच्या पायऱ्यांवरुन उतरताना त्यांच्य पायाला दुखापत झाली होती.
व्हायरल काय होत आहे?
फेसबुक यूजर Anshul Bairagi MP (Archive Link) यानं व्हायरल फोटो 11 डिसेंबरला शेअर करत म्हटलं होती की " आपण पुष्पा 2 मध्ये मश्गूल असताना, तिकडे लवगुरु यांचा पाय तुटला, ते जखमी झाले आहेत, देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी देवानं घ्यावी.
पडताळणी
या पोस्टची पडताळणी करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा फोटोला गुगल रिवर्स इमेजवर सर्च केलं, त्यावेर आम्हाला हा फोटो शशी थरुर यांच्या सोशल मिडिया खात्यावर 16 डिसेंबर 2022 ला पोस्ट केल्याचं आढळून आलं. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, काल संसदेत एक पायरी चुकल्यानं पाय दुखापतग्रस्त झाला होता, काही तास दुर्लक्ष केल्यानंतर वेदना वाढल्या त्यामुळं रुग्णालायत जावं लागलं. आता माझ्य पायात प्लॅस्टर आहे, मात्र प्रकृती स्थिर आहे. आज संसेदत जाऊ शकणार नाही, पुढील आठवड्याच्या मतदारसंघातील भेटी देखील रद्द केल्यात असं शशी थरुर म्हणाले.
A bit of an inconvenience: I badly sprained my left foot in missing a step in Parliament yesterday. After ignoring it for a few hours the pain had become so acute that I had to go to hospital. Am now immobilised w/a cast, missing Parliament today&cancelled wknd constituency plans pic.twitter.com/Ksj0FuchZZ
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) December 16, 2022
आता हे स्पष्ट झालं की हा फोटो जुना आहे. मात्र शशी थरुर यांच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी सर्च केलं असता काही बातम्या मिळाल्या. आम्हाला 13 डिसेंबर 2024 चं वृत्तसंस्था पीटीआयची एक्स वरील पोस्ट आढळली. त्यामध्ये शशी थरुर यांची प्रकृती ठीक असल्याचं स्पष्टहोतं.
या ट्वीट शिवाय शशी थरुर यांचं 12 डिसेंबरचं एक ट्विट मिळालं ज्यात त्यांनी म्हटलं की माझा दोन वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल करुन चुकीचा दावा केला जात आहे. असं करुन सध्याच्या मुद्यांवरुन लक्ष भरकटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. माझ्या तब्येतीची काळजी आणि चिंता व्यक्त करणाऱ्या सर्व लोकांना सांगताना आनंद होतो की माझा पाय ठीक असून मी रोज संसेदत भाग घेत आहे. काल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विधेयकावर देखील बोललो, असं शथी थरुर म्हणाले.
When the usual troll factory is reduced to circulating a two year old picture of mine with a sprain led foot, accompanied by picayune comments, one realises how desperate they are for a distraction! For all those expressing concern about my well-being, I am pleased to say that…
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) December 12, 2024
आम्ही या विषयाला दुजोरा देण्यासाठी काँग्रेसचे सोशल मिडिया सेलचे प्रभारी गिरीश कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शशी थरुर यांचा फोटो जुना असल्याचं स्पष्ट केलं. व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Anshul Bairagi Mp याचे जवळपास 10 हजार फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष : सोशल मीडियावर शशी थरुर यांचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं पाहायला मिळतं आणि तो फोटो आताचा असल्याचा दावा करण्यात येत होता, तो दावा चुकीचा असल्याचं विश्वास न्यूजच्या पडताळणीत स्पष्ट झालं, कारण फोटो 2022 मधील आहे.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूज वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]