Video : हृदयद्रावक! लग्नाची मिरवणूक दारात, नवरदेव घोड्यावर बसला पण नियतीने घात केला; मंडपातच घेतला अखेरचा श्वास
Viral News : मध्य प्रदेशातील श्योपूर येथून एका लग्नाचा आनंद अचानक शोकात रुपांतरीत झाल्याची वेदनादायक घटना समोर आली आहे.

Viral News : मध्य प्रदेशातील श्योपूर येथून एका लग्नाचा आनंद अचानक शोकात रुपांतरीत झाल्याची वेदनादायक घटना समोर आली आहे. यात लग्नाची मिरवणूक दारात होती आणि नवरदेव घोडीवर बसले होते. तर वाराच्या पुढे वरातीतील लोक आनंदाने नाचत होते. दरम्यान अचानक नवरदेव मुलगा खाली पडू लागली आणि काही वेळातच वराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील श्योपूर येथे घडली असून एनएसयूआयचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप जाट, ज्यांना टोनी म्हणूनही ओळखले जाते, त्यांचे लग्नाच्या दिवशीच त्यांचा दुदैवी अंत झाला आहे. या घटनेने परिसरासह जिल्ह्यात शोककळा पसरली असून हृदयविकाराचा झटका आल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र लग्नाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात शोकात झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, लग्नाच्या आनंदाचे शोकात रूपांतर
पुढे आलेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी(15 फेब्रुवारीला) घडली असून त्यांच्या मूळ गावी झिरनिया सुसाबदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये प्रदीप घोडीवर बसलेला दिसत आहे. तर त्यांच्या पुढे वरातीतील लोक आनंदाने नाचत होते. दरम्यान अचानक त्याची मान खाली गेलेली या व्हिडिओमध्ये दिसते आहे. ही बाब उशिरा लक्षात आल्यानंतर लग्नातील पाहुण्यांना काही समजण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज ही उपस्थितांना येतो. अशातच प्रदीप यांना ताबडतोब घोडीवरुन उतरवत रुग्णालयात नेले असता तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानुसार प्रदीप यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोण आहेत प्रदीप जाट?
या हृदयद्रावक घटनेतील प्रदीप जाट हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगेश जाट यांचे पुतणे होते. ते स्वतः एनएसयूआयचे श्योपूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते. या दु:खद घटनेमुळे त्यांच्या वैवाहिक सुखाचे शोकात रूपांतर झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मेहंदी लावून बसलेली नववधू ही बेशुद्ध झाली. तर ही बातमी सर्वत्र पासरताच सर्वांना हे वृत्त ऐकून धक्का बसला. प्रदीप यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे.प्रदीप हे कुटुंबातील सर्वात लहान सदस्य होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रदीपचे मित्र आणि नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रदीप आता या जगात नाही यावर त्यांचा विश्वास बसत नाही.
मध्य प्रदेश के श्योपुर में एक दर्दनाक वाकया हुआ है. यहां एक शादी की खुशियां एकाएक मातम में बदल गईं. दरअसल, शादी समारोह में डांस करने के बाद दूल्हा वापस घोड़ी पर चढ़ा लेकिन थोड़ी ही देर में घोड़ी पर ही बैठे-बैठे दूल्हे की सांस रुक गई. आननफानन में परिजन और बाराती दूल्हे को अस्पताल… pic.twitter.com/l65Gbjk3a5
— ABP News (@ABPNews) February 15, 2025
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

